रमजानमध्ये मशिदीत नमाज अदा केल्यानंतर मौलवीला झाली कोविड -१९ ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील स्थानिक मशिदीत नमाज पठण करणाऱ्या मौलवीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बीडियूझेन २४ च्या वृत्तानुसार, मौलवी यांनी मगुरा जिल्ह्यातील आडंगा गावात मशिदीत शनिवारी रमजानच्या नमाजचे नेतृत्व केले आणि एका दिवसानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. बातमीनुसार, अधिकारी नमाजमध्ये सामील झालेल्या २०-२५ लोकांची यादी … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २८ हजाराच्या दारात; २४ तासात सापडले १३९६ नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे १ हजार ३९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या देशातील रुग्णांची संख्या ही आता २७ हजार ८९२ इतकी झाली आहे. ३८१ रुग्णांना एकाच दिवसात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचसोबत रुग्णांचा … Read more

टेस्टिंग किट विक्रीतून नफेखोरी करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करा- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना काही लोक मात्र नफेखोरी करण्यास चुकत नाही आहेत. अशा भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते, घृणा निर्माण होते, अशा तीव्र भावना व्यक्त करताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत देशातील नफेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केंद्राला केली आहे. अशा नफेखोरांना देश कधीही माफ करणार नाही, असेही राहुल … Read more

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडले ‘हे’ २१ महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली । देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी अशा पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही चौथी वेळ होती. गेल्या तीन बैठकांमध्ये फारशी संधी न मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना यावेळी प्राधान्यानं बोलण्याची संधी देण्यात आली … Read more

तापाने फणफणारा तो बांगलादेशातून पोहत आसाममध्ये आला; म्हणाला मला कोरोनातून मुक्त करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील देश त्रस्त झालेले आहेत. अनेक सामर्थ्यवान देशांनी कोरोनासमोर गुडघे टेकले आहेत.अशा संकटाच्या काळात भारत अद्यापही कोरोनाशी झुंज देत आहे. हेच कारण आहे की तापाने ग्रस्त असलेला एक बांगलादेशी तरूण कुशीरा नदीतून पोहत पोहत आसामच्या सीमेवर आला.येथे पोहोचल्यावर त्याने करीमपूर जिल्ह्यातील मुबारकपूर गाठले आणि गावकऱ्यांना सांगितले की, त्याला कोरोना … Read more

पाकिस्तानी नाही सुधाणार; POK मधील लाँच पॅडसवर ४५० दहशतवादी मोठया हल्ल्याच्या तयारीत?

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाच्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानसारख्या देशाला सुद्धा कोरोनाची मोठी झळ पोहोचली आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईच्या मार्गावर आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. त्याचे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरुच आहेत. याच कारण म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या १४ लाँच पॅडसवर … Read more

टाळेबंदीत नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा; पत्नी पीडित संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

औरंगाबाद प्रतिनिधी । टाळेबंदीत अनेक ठिकाणी महिलांकडून पुरुषांचा छळ केला जात आहे. त्यामुळे वैतागलेला पुरुष घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब त्या व्यक्तीसाठी आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने समाजालादेखील घातक आहे. टाळेबंदीमुळे कौटुंबिक तणाव वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. टाळेबंदीमुळे घरी असलेल्या नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा, अशी मागणी पत्नी पीडित संघटनेने … Read more

कोरोना व्हायरस वरील वॅक्सिनबाबत जगाला भारताकडून आशा! ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरात २ लाखाहून अधिक लोकांचा जीव गेलेला आहे तसेच सुमारे ३ दशलक्ष लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे. जगातील सर्व देश या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी लसी किंवा औषधे तयार करण्यात गुंतले आहेत परंतु असे असूनही कोणालाही अजून यामध्ये यश आलेले नाही आहे. अशा परिस्थितीत आता कोविड -१९ लससाठी जग … Read more

पुणे दहशतीत! एकाच रात्रीत आढळले ५५ कोरोनाग्रस्त

पुणे । काल रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात एकाएकी ५५ रुग्ण आढळल्याने पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ३१९वर पोहोचली असून आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. पुण्यातील कसबा, भवानी पेठ, येरवडा, हडपसर या क्षेत्रीय कार्यालय परिसरात हे करोनाचे रुग्ण सापडले आहेत. पुणे शहर जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत ५५ रुग्णांची वाढ झाली … Read more

कोरोना संकटात शेतकऱ्यांचं योगदान लाखमोलाचं..!! बळीराजानं आपल्याला उपाशी मरण्यापासून वाचवलंय..!!

प्रतिकूल परिस्थिती असूनही संकटकाळात शेतकरी उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शेतकऱ्यांना आता सरकारची गरज आहे.