देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजारा पार; गेल्या २४ तासात १६८४ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली । देशभरात गेल्या २४ तासात १६८४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे … Read more

राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता- राजेश टोपे

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत असून राज्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात असलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आज … Read more

वुहान येथून बेपत्ता झालेला पत्रकार २ महिन्यांनंतर सापडला,गायब होण्यामागचे कारण सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील कोरोनाव्हायरस या साथीच्या सुरुवातीच्या काळात वुहानमधून गायब झालेला एक नागरिक पत्रकार सुमारे २ महिन्यांनंतर परत आला आहे.वुहानच्या या नागरिक पत्रकाराने कोरोना विषाणूशी संबंधित व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिलेली होती. त्यानंतर तो अचानक गायब झाला.परत आल्यावर पत्रकाराने सांगितले की चीनी पोलिसांनी त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि क्वारंटाइन केले. … Read more

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे आजी मुख्यमंत्री ठाकरेंना खास पत्र! केल्या ‘या’ विशेष सुचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे. अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने … Read more

सिगरेटमुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होऊ शकतो? फ्रांसमध्ये संशोधन सुरु

वृत्तसंस्था । कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील संशोधक कसोशीने प्रयन्त करत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसपासून जगाला मुक्त करण्यासाठी लस निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. यातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. अशाच एका प्रयोगानुसार सिगारेटमध्ये असणारा निकोटिन हा घटक कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? या दृष्टीने आता संशोधन सुरु … Read more

सचिनच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पोलिसांनी दिला नागरिकांना ‘स्ट्रेट ड्राईव्ह’चा सल्ला

#HappyBirthdaySachin । आपल्या फलंदाजीतून अनेकांना आनंद देणाऱ्या, क्रिकेटला नवी कलाटणी देणाऱ्या, क्रिकेटमधील अनेक विक्रम नावावर असणाऱ्या, विश्वात चाहत्यांनी देवाची पदवी बहाल केलेल्या लाडक्या सचिनचा आज वाढदिवस. आज जगभरातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलिसांनीदेखील सचिनला आज शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्र पोलिसांनी सचिनला ‘टन’भर शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी सचिनला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना राज्यातील … Read more

आईच्या औषधांसाठी तिने केला ८० किलोमीटरचा प्रवास..!! लॉकडाऊन कालावधीतील कविताच्या जिद्दीची प्रेरक कहाणी

तब्बल १२ दिवसांच्या खेळ-खंडोब्यानंतर कविताने मनाशी ठरवलं – आईच्या जीवाशी खेळ नकोच, आता चालत म्हटलं तरी जाऊ, पण औषधं घेऊनच येऊ. आणि सुरु झाला प्रवास धाडसाचा. रोड सरळ असला तरी आईनेसुद्धा हट्ट केला होता, की मी सोबत येते म्हणून..!! तिच्या त्या अवस्थेतही ती लेकीसोबत निघाली. स्वतःच्या औषधरुपी व्हेंटिलेटरचा आसरा घ्यायला.

कोरोनाच्या लढ्यात गाव-खेडयांच्या सहभागाला मोदींनी केला सलाम, म्हणाले..

नवी दिल्ली। ”देशाला प्रेरणा देण्याचं काम गावातील जनतेनं केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन अशा मोठ्या शब्दांचा प्रयोग न करता ‘दो गज दूरी’ असा शब्द वापरून गावातील जनतेनं कोरोनाचा सामना केला. अशा प्रकारांवरूनच इतरत्र कोरोनाचा भारतानं कसा सामना केला याची चर्चा होत आहे. भारताचा नागरिक कठीण परिस्थितीत त्याच्या समोर झुकण्यापेक्षा त्याचा सामना करत आहे,” असं मत पंतप्रधान … Read more

कोरोना फोफावतोय! एकाच दिवसात आढळले ७७८ नवे रुग्ण, गाठलं ६ हजाराचं शिखर

मुंबई । देशातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गुरुवारी कोरोनाचे ७७८ नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. यासोबत राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या एकूण ६ हजार ४२७ करोनाबाधित रुग्ण आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या २८३ आहे. … Read more

खरंच कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात नष्ट होतो? अमेरिकी शास्त्रज्ञांचा मोठा दावा

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या महामारीला निकालात काढण्यासाठी संपूर्ण जग निकाराची लढाई लढत आहे. या महामारीला जगातून हद्दपार करण्यासाठी असंख्य संशोधक या कोरोना व्हायरसच्या सखोलअभ्यासात गुंतले आहेत. दरम्यान, भय आणि अनिच्छतेच्या वातावरण कोरोना व्हायरसबाबतचे रोज नवे दावे समोर येत आहेत. असाच एक दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाचा व्हायरस सूर्यप्रकाशात … Read more