करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण नक्की जिंकू- नितीन गडकरी

नवी दिल्ली । जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या लढाईत पुढे आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ तसंच करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वास … Read more

घाबरु नका, जनतेसाठी सरकारी तिजोरी नेहमीच उपलब्ध – नितीन गडकरींचा देशवासीयांना दिलासा

देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला असताना ती भरुन काढण्यासाठीच्या सर्व उपाययोजना हळूहळू अंमलात आणणं सुरु असून महिना अखेरपर्यंत आपण कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

गरवारे बेस्ट्रेचची स्थानिक यंत्रणांप्रती दृढ कृतज्ञता

जगभरात पसरलेल्या कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे जगभरातील कर्मचारी वैद्यकीय व्यावसायिकांना आवश्यक ती उत्पादने पुरवण्याचे काम करण्यासाठी अपार कष्ट घेत आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जगभरात लोकांचे प्रमाण वाचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असे गरवारे बेस्ट्रेचने जाहीर केले आहे.

कोरोनावरुन अमेरिकेत चीन विरुद्ध पहिली केस दाखल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला धोक्यात आणल्याच्या आरोपावरून चीनविरूद्ध अमेरिकेत पहिला दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चीनविरूद्ध कायद्याचा आधार घेणारे मिसुरी हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे.या खटल्यात चीनने कोरोना विषाणूची जाणीवपूर्वक माहिती लपवून ठेवली,याबाबत सतर्क करणाऱ्यांना अटक केली आणि हा आजार संसर्गजन्य असल्याची शक्यता नाकारल्याचा आरोप करण्यात आला आणि … Read more

राज्य करोनाशी लढतंय अन् भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय, रोहित पवार भडकले

मुंबई । राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपाच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय अशा शब्दात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या कोरोना संकट काळातील भूमिकेवर आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झाला असून त्याविरोधात एका भाजपा नेत्याने उच्च न्यायालयात … Read more

…. तर लाखो लिटर बीअर जाणार वाया! जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.देशात २४ मार्च पासून लॉकडाउन सुरु करण्यात आला असून आता ३ मे पर्यंत तो वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे.याचा चांगलाच फटका उद्योगधंद्यांना बसला आहे.या लॉकडाउन दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील मायक्रोब्रुअरीजकडून हजारो लिटर बीअर नाल्यांमध्ये टाकून देण्यात येत आहे.आतापर्यंत एनसीआरमध्ये तब्बल १ लाख लिटर फ्रेश … Read more

उद्धव-देवेंद्र यांच्या शासकीय निवासात कोरोनाचा शिरकाव; पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर तैनात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महिला कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या दोन्ही शासकीय निवास्थानावरील तैनात असलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास … Read more

पती पत्नीने लाॅकडाउनमध्ये खोदली २५ फुट खोल विहीर, २१ व्या दिवशी लागले पाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरात बसून काहीतरी नवीन करण्याचा विचार महाराष्ट्रातील एका जोडप्याने केला. गजानन पाकमोडे आणि त्यांच्या पत्नीने वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावात आपल्या घराच्या अंगणात २५ फूट खोल विहीर खोदली आहे. ही विहीर खोदण्यासाठी त्या दोघांना २१ दिवस लागले. यासंदर्भात गजानन म्हणाले की कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरातच राहावे लागेल, म्हणून … Read more

लॉकडाऊनपासून आतापर्यंत राज्यात 49 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजे 22 मार्च पासून ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत किती पोलिसांना कोरोनाची लागण झाली याची आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील 11 पोलीस अधिकारी व 38 पोलिसांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळाली आहे. राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी … Read more

चीनमधून मधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवा; आयसीएमआरची राज्यांना सूचना

नवी दिल्ली । चीनमधून आयात केलेल्या राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २ दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआर(Indian council of medical research)चे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. … Read more