Sunday, April 2, 2023

गरवारे बेस्ट्रेचची स्थानिक यंत्रणांप्रती दृढ कृतज्ञता

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | गरवारे बेस्ट्रेच लिमिटेड (जीबीएल) या जगातील सर्वांत मोठ्या लॅटेक्स व लॅटेक्स-फ्री इलॅस्टिक रबर उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे उत्पादन कारखाने महाराष्ट्रातील वाई येथे तसेच अमेरिकेतील व्हरमाँट येथे आहेत. कंपनी जगभरातील ८५ हून अधिक देशांना आपल्या उत्पादनांचा पुरवठा करते. जीबीएलचे रबर टेप्स हे फेस मास्क, व्यक्तिगत संरक्षक उत्पादने (पीपीई), फेस शिल्ड्स आणि अन्य वैदयकीय तसेच वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांच्या निर्मितीतील महत्वाचा घटक आहे. भारतातील तसेच जगभरातील आघाडीच्या वैदयकीय व वैयक्तिक स्वच्छता उत्पादक कंपन्या ह्या जीबीएलच्या ग्राहक आहेत.

जगभरात पसरलेल्या कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे जगभरातील कर्मचारी वैद्यकीय व्यावसायिकांना आवश्यक ती उत्पादने पुरवण्याचे काम करण्यासाठी अपार कष्ट घेत आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जगभरात लोकांचे प्रमाण वाचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असे गरवारे बेस्ट्रेचने जाहीर केले आहे.

- Advertisement -

आपल्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून कंपनीने व्हेंटिलेटर्सच्या स्वरूपात वैद्यकीय उपकरणे महाराष्ट्रातील सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला गरवारे बेस्ट्रेच सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पुरवली आहेत. तसेच पुढील आठवड्यात पीपीई किट्स देण्याचे देखील कबुल केले आहे. या साथीविरोधातील लढ्यातील योगदान आणखी वाढवण्यासाठी जीबीएल सातारा येथील उत्पादक संघटनेला रबर टेप्स देणगी स्वरूपात देऊन स्थानिक जनतेसोबत काम करत आहे. या टेप्स कापडी मास्क तयार करण्यासाठी वापरल्या जातात. जीबीएलने आंतरकार्यात्मक (क्रॉस फंक्शनल) कर्मचारी सक्रिय ठेवले आहेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाईल.

“या गरजेच्या काळात सेवा देता येत आहे याचा गरवारे बेस्ट्रेचला अभिमान आहे. या जागतिक स्तरावरील कार्यात सहाय्य करण्यासाठी आमची टीम प्रेरित आहे आणि आम्ही आमच्या कमाल क्षमतेने योगदान देऊ याची निश्चिती करत आहे.” असं कंपनीचे चरणदीप सिंग कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले.