कोरोना व्हायरस लॉकडाउन: पाच जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, एकाचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केरळमध्ये कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये किमान पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर इतरांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृताचे नाव थ्रिसूर येथील रहिवासी ३५ वर्षीय सनोज असे आहे. या सर्वांना दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जाते, ज्यांनी लॉकडाऊनमुळे मद्यपान न केल्यामुळे हे पाऊल उचलले. दरम्यान, … Read more

कोरोनाबाबत चीनचा मोठा खूलासा! जाणुन घ्या कोरोनाचे CIA कनेक्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या सैनिकी इंटेलिजेंस अधिकाऱ्याने एक लेख लिहिला आहे ज्यामुळे आता संपूर्ण जग अवाक झाले आहे. हा अधिकारी म्हणतो की जर त्याने आपली ओळख उघड केली तर त्याचा जीव धोक्यात येईल पण तो अगदी स्पष्टपणे सांगत आहे की त्याच्याकडे अशी माहिती आहे ज्यात चीनचे सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे. या अधिकाऱ्याने सांगितले … Read more

कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा, सरकार तुमची सोय करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत हातावर पोटावर असलेले अनेक कामगार, मजुर आपल्या घराकडे जाण्यासाठी वेळ पडली तर पायी किंवा अवैधरित्या चोरून वाहनांनी प्रवास करत आहेत. असे सर्व स्थलांतरित कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा. तुमच्या राहण्याची व जेवणाची सोय सरकार … Read more

जीवावर उदार होऊन काम करणार्‍या डाॅक्टर, पोलिसांना माझा मानाचा मुजरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील सर्व डाॅक्टर अतिशय धेैर्याने कोरोनाविरुद्ध लढत आहेत. मला आपल्या सर्व डाॅक्टरांचा अभिमान आहे. मीया सर्व डाॅक्टरांना मानाचा मुजरा करतो असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेवेवर असणार्‍या सर्व डाॅक्टरांचे कौतुक केले. मी रोज काही डाॅक्टरांशी फोनवर बोलतो. तेव्हा मी त्यांना विचारतो तुम्ही कसे आहात तर तेव्हा ते मलाच म्हणतात तुम्ही … Read more

राज्यात करोनाचा ७ वा बळी; मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईत एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या महिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत करोनानं ५ बळी घेतले आहेत. … Read more

शिवभोजन आता फक्त ५ रुपयांत; करोनामुळं सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा बंदच्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या योजनेचा … Read more

इटलीमध्ये मृतांचा आकडा १० हजारांवर; तर युरोपात ३ लाख लोकांना संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जीवघेणा करोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजार २३ झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या … Read more

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये ५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा ५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाशी यशस्वी सामना केल्याबद्दल भोसरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज केलेले ३ आणि आजचे … Read more

कोरोनामुळे स्पेनच्या राजकुमारीचा मृत्यू, पॅरिस मध्ये घेतला शेवटचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्याचा भाऊ प्रिन्स सिक्स्टो एनरिक डे बोर्बन यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली. २६ मार्च रोजी राजकन्या मरण पावली. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. संपूर्ण जगातील कोणत्याही रॉयल कुटुंबातील हा पहिला मृत्यू आहे. … Read more

महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडतच आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधितांची एकूण संख्या १९३ झाली आहे. ७ रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर … Read more