करोना इफेक्ट: टोपचा आठवडी बाजार, बिरदेव यात्रा आणि इतर कार्यक्रमही रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार दर गुरुवारी होणारा आठवडी बाजार आणि खाटीक व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री बिरदेव यात्रा हि दरवर्षी गुढीपाडव्यापासुन पाच दिवस चालते हीदेखील शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आली आल्याची माहिती टोपच्या लोकनियुक्त सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच शिवाजीराव पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आ र. देवकाते … Read more

कोल्हापूरात वैद्यकीय सेवेतील सर्वांना मिळणार ‘कॉटन मास्क’

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्हयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स आदी सर्वांना मास्क देणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमधील कोरोना स्वतंत्र कक्षाला खासदार माने यांनी भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱया वैद्यकीय सेवा व सुविधांचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते. मास्कच्या उपलब्धतेसाठी इचलकरंजीतील गारमेंट … Read more

जिल्ह्यात परदेश दौऱ्यावरून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन करून घ्यावे- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश तसेच जिल्ह्याबाहेरुन प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी स्वत: आरोग्य तपासणी करून 14 दिवस घरीच स्वत:ला होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून आवश्यक उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या … Read more

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनो विषाणूचा परिणाम आता भारतीय उद्योगांवर दिसू लागला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, या प्राणघातक कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायाला फटका बसला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्वेलरी उद्योगाच्या मागणीत ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. आता देशभरात फक्त २० ते २५ टक्के व्यवसाय होत आहे. ऑल इंडिया जेम्स अँड … Read more

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही … Read more

जगातील सर्वात मोठ्या हॉटेल चेनने १०००० कर्मचार्‍यांना दिली बिनपगारी सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी हॉटेल साखळी मॅरियट इंटरनॅशनलने कर्मचार्‍यांना रजेवर पाठवले आहे. ही रजा बिनपगारी स्वरूपात दिली आहे. म्हणजेच या सुट्यांना कर्मचार्‍यांना पगार मिळणार नाही. करोनो व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं लोकांनी प्रवास थांबविला आहे. ज्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. मॅरियटने जवळपास सर्व स्तरावरील कर्मचारी सुट्टीच्या दिवशी पाठवले आहेत. यासह कंपनीने आपली काही … Read more

करोनामुळं IPL स्पर्धा पुन्हा लांबली; आता एप्रिलऐवजी ‘या’ महिन्यात IPL 2020 चे आयोजन?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2020 चे आयोजन २९ मार्च २०२० पासून करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळं यंदाची IPL 2020 १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. या स्थगितीनंतर IPL च्या यंदाच्या हंगामातील सामन्यांची संख्या कमी करून छोटेखानी IPL खेळवण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात असतानाच आता IPL 2020 बद्दल नवीन माहिती सांगण्यात येत आहे. बीसीसीआयला … Read more

Video: करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सचिन करतोय जनजागृती, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे शाळा-कॉलेजं, मॉल, थिएटर, नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत … Read more

‘घोर कलियुगात आपण करोनाशी लढू शकत नाही’- जस्टीस अरुण मिश्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. न्यायमूर्ती … Read more

कोल्हापूरच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जिल्ह्यामध्ये अन्न धान्य, पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकचा गॅस यांचा पुरेसा साठा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात पेट्रोलियम कंपन्या तसेच बाजार समितीचे व्यापारी यांच्या सोबत बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more