कोरोनाच्या भीतीने जोडप्याने संपवले जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज

Sucide

बंगळुरू : वृत्तसंस्था – देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अजूनही आटोक्यात आलेली नाही. याचदरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 40 वर्षाच्या व्यक्तीनं आणि त्याच्या पत्नीनं कोरोनाची लक्षणं दिसताच भीतीनं आत्महत्या केली आहे. हि घटना कर्नाटकमधील आहे. या दोघांनी आत्महत्या करण्याआधी मंगळुरु पोलिसांना एक व्हॉईस मेसेजही पाठवला होता. या जोडप्याचे नाव … Read more

आजपासून खासगी कोचिंग सुरु करणार; भाजपप्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशनचा निर्णय

private coching classes

औरंगाबाद – सरकारच्या वतीने कोरोना काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्क्लासेस बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही ती सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून संचालक व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही उपासमारी थांबविण्यासाठी आजपासून शहरातील खासगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपप्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशनने केली … Read more

ऑक्सिजनची नागरिकांना आवश्यकता भासूच नये – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

औरंगाबाद | कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. यासाठी सर्वांनी जबाबदारीने या संकटापासून वाचण्यासाठी सातत्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) याचे पालन करणे आवश्यक आहे. मेल्ट्रॉन येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (पीएसए प्लांट) आज लोकार्पण झाले. तरी या प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या ऑक्स‍िजनची अधिक आवश्यकता भासू नये, अशी इच्छा पर्यटन, पर्यावरण आण‍ि राजश‍िष्टाचार मंत्री आदित्य … Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सक्षम – पालकमंत्री सुभाष देसाई

subhash desai

औरंगाबाद – जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आलेला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना संबंधी आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपन भूमरे, प्रभारी जिल्हाधिकारी … Read more

28 कोरोना बधितांची नव्याने भर, एकाचा मृत्यू

corona

औरंगाबाद | गेल्या 24 तासात जिल्ह्यात 28 नव्या कारोना रुग्णांची भर पडली. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 10 तर ग्रामीण भागातील 18 रुग्णांचा समावेश आहे. 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 238 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनपा हद्दीतील 10 रुग्ण आढळले असून भडकल गेट 1, सेवन हिल … Read more

केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण बंद करावे लागत आहे; नवाब मलिकांचा आरोप

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची संख्या २० लाख असून पहिला डोस घेणाऱ्या लोकांची … Read more

समाधानकारक ! शहराच्या एंट्री पॉइंटवर एकही पॉझिटिव्ह नाही

corona

औरंगाबाद | मागील दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. याला औरंंगाबाद शहर देखील अपवाद नाही. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेने धडक मारली आणि पुन्हा एकदा हाहाकार उडाला होता. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी तसेच आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व शासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या, त्यामध्येच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा … Read more

‘त्या’ दिवशी पुन्हा लॉकडाउन लावणार; राजेश टोपेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधात शिथिलता आणली आहे. परंतु राज्यात तिसऱ्या लाटेची भीती कायम असून तिसऱ्या लाटेत जर राज्याला ठराविक मर्यादेपेक्षा ऑक्सीजन अधिक लागला, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या … Read more

खबरदारी ! पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबाची होणार ‘आरटीपीसीआर’

Corona Test

औरंगाबाद | औरंगाबाद शहरात परिसरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचा रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबाची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल, असे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले आहे. प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या लाटेची तयारी सुरू करण्यात आली आहे. ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता, बालकांसाठी विशेष कोविड केअर सेंटर … Read more

मनपाच्या सीबीएससी शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू; प्रवेश पूर्ण तरीही पालकांची चौकशी सुरूच

औरंगाबाद | महानगरपालिकेकडून शहरातील गरीब इंग्रजीतून मुलांना शिक्षण मिळावे यासाठी सीबीएससी वर्ग सुरू करण्यात आले होते. यामध्ये गुरुगोविंदसिंगपुरा गारखेडा या दोन्ही शाळेतील सीबीएससीच्या ऑनलाईन शिकवणीला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शाळेत प्रवेशासाठी पालकांच्या उड्या पडल्याने पालिकेला प्रतीक्षा यादी तयार करण्याची वेळ आली आहे. 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या शाळेचे … Read more