जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील अव्व्ल क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच हा मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. या सर्बियन टेनिस स्टारने बेलग्रेडमध्ये पोहोचल्यानंतर सोमवारी सहपरिवार कोविड -१९ ची चाचणी केली होती. जोकोविच तसेच त्याची पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मात्र,आनंदाची बातमी अशी आहे की त्यांची मुले या साथीच्या रोगाला बळी पडू शकलेले नाहीत. अंतिम … Read more

फक्त ५ दिवसांत कोरोना होणार बरा; रामदेव बाबांचे कोरोनावरील औषध लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होतो आहे. अनेक शास्त्रज्ञ यावर औषध शोधण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करत आहेत. जगभरात यावर काम सुरु आहे. मात्र अद्याप कुणाला यश आलेले दिसत नाही आहे. आता रामदेव बाबा यांच्या पतंजलीने यावर औषध शोधले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोनावरील … Read more

कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी आपली एसयूव्ही विकून 250 कुटुंबांसाठी त्याने खरेदी केले ऑक्सिजन सिलेंडर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा सर्वाधिक कहर हा देशातील महाराष्ट्र या राज्यात सुरू आहे. देशभरातील एकूण प्रकरणांपैकी 31 टक्के सक्रिय प्रकरणे ही या राज्यातील आहेत. मुंबई हे कोरोनाचे एपिसेंटर बनले आहे. इथे अशी हालत आहे की आता रुग्णालयात रूग्णांसाठी बेड रिकामी नाहीत. ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर देखील कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील बरेच लोक … Read more

मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली गुन्हेगारीचे वाढते प्रमाण सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. अशा वेळी जे प्रकरण समोर आले आहे ते महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची झपाट्याने वाढ होते आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील परिस्थितीही चिंताजनकच आहे. खरं तर, मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत आहेत आणि आता या क्वारंटाईन सेंटरमध्येही गुन्हेगारीच्या घटना … Read more

कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

‘या’ दवाखान्यात कोरोना रुग्णांवर होतेय TikTok थेरपी; डाॅक्टरच देतात चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस परदेशात आणि भारतातही वेगाने पसरत आहे. बहुतेक देश या साथीशी अजूनही संघर्ष करीत आहेत. त्याचबरोबर, जगभरात त्याच्या उपचारासाठी प्रभावी औषध तसेच लस विकसित करण्याचे काम चालू आहे. या सर्वा व्यतिरिक्त, अशा काही पद्धती आहेत ज्या कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढवून कोरोनाशी लढण्याची शक्ती देतात. मिझोरममधील कोविड … Read more

कोरोना संकटात नोकरी जाऊनही भरावा लागणार टॅक्स; जाणून घ्या संपूर्ण नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बहुतेक कंपन्यांना तोटा नियंत्रित करणे कठीण जात आहे. त्याचबरोबर बाजारातील कमी मागणीमुळे उत्पादनही सध्या पूर्वीप्रमाणे केले जात नाही आहे. अशा परिस्थितीत कंपन्या रिटायरमेंटच्या जवळ असलेल्या कर्मचार्‍यांना अकाली सेवानिवृत्ती (व्हीआरएस) देऊन आपली आर्थिक जबाबदारी कमी करत आहेत. त्याचबरोबर कंपन्या काही तरुण कर्मचार्‍यांना … Read more

१ जुलै पासून ATM वरुन पैसे काढण्याचा ‘हा’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होण‍ार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन आणि कोरोनामुळे आधीच आर्थिक दबावात असलेल्यांना ही बातमी एका धक्क्यापेक्षा कमी नाही आहे. येत्या १ जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याचे नियम आता बदलले जात आहेत, यामुळे तुमच्या खिशावरील ताण वाढेल. १ जुलैपासून एटीएम कॅश पैसे काढणे आपल्यासाठी महाग होणार आहे. होय, कोरोना संकटाच्या वेळी वित्त मंत्रालयाने एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठीचे सर्व … Read more

सोलापूरातील ७१ हजार ९०४ कामगारांच्या खात्यात १४ कोटी रुपये जमा

सोलापूर प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांचा उदरनिवार्हाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने त्यांच्याकडे नोंद असलेल्या तसेच नूतनीकरण केलेल्या व सक्रिय असलेल्या कामगारांना दोन हजार रुपयाची मदत जाहीर केली. याचा लाभ जिल्ह्यातील 71904 कामगारांना मिळाला असून त्यांच्या खात्यात 14 कोटी 38 लाख … Read more

बांगलादेश क्रिकेटमध्ये उडाली खळबळ, मशरफी मुर्तझासहित अन्य दोन खेळाडूही निघाले कोरोना पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या तपासणीत बांगलादेशचा माजी कर्णधार मशराफी मुर्तझा आणि अन्य दोन क्रिकेटपटू नजमुल इस्लाम आणि नफीस इक्बाल हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंतर कोराना विषाणूचा संसर्ग झालेला तो दुसरा मोठा क्रिकेटर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुर्तजा अस्वस्थ असल्याचे सांगण्यात आले आणि शुक्रवारी त्याचा कोविड -१९ ची तपासणी … Read more