मागील २४ तासात देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; संख्या झाली इतकी

नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली … Read more

टेस्ट क्रिकेटचे उदाहरण देऊन अनिल कुंबळेने कोरोना विषाणूचा पराभव करण्याचे केले आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शनिवारी सांगितले की, आम्हाला कोरोनाव्हायरस या साथीला एखाद्या कसोटी सामन्याप्रमाणे घ्यावे लागेल आणि संपूर्ण देशाला त्याविरुद्ध एकत्रितपणे लढावे लागेल आणि जिंकूनही द्यावे लागेल. माजी लेगस्पिनर कुंबळेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कुंबळेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “जर आपल्याला या कोरोनोव्हायरस साथीविरोधात लढायचे … Read more

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९,०६३ वर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यामुळे दरोरोज मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे आणखी १०८९ रुग्ण वाढले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९,०६३ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाचे १६९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज वेगवेगळ्या भागात कोरोनाचे … Read more

अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते. जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही … Read more

भारतात कोरोनाचे कम्युनिटी ट्रांन्समिशन सुरु? रोज सापडतायत ३ हजार हून अधिर रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण प्रकरणे सुमारे ६० हजारांपर्यंत पोहोचली आहेत. भारतातील पहिल्या प्रकरणाच्या नोंदी नंतर पुढील ३० दिवस तुलनेने शांत राहिले. त्यानंतर मात्र या प्रकरणांच्या संख्येत हळूहळू वाढ झाली.पहिल्या ५० दिवसांत भारतात २०० पेक्षा कमी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच प्रकरणांच्या वाढीस वेग आला आहे आणि मेच्या सुरुवातीच्या दिवसांत … Read more

चिंता वाढत आहे! देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचत आहे. सुरुवातीला धीम्या गतीनं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं वाढू लागला आहे. अर्थात देशाच्या काही भागांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे हे नाकारता येणार नाही. असं असलं, तरीही रुग्णांचा वाढता आकडा हा देशाचा वाढता धोका अधोरेखित करत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ कार्यक्रमांमुळेच गुजरातमध्ये कोरोना फोफावला; काँग्रेसचा आरोप

अहमदाबाद । गेल्या फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, हा कार्यक्रम आता कोरोनामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला, असा दावा गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी केला आहे. सध्या गुजरातमधील … Read more

चिंता वाढली! देशात २४ तासांत 195 बळी, 3 हजार 900 नवे कोरोना रुग्ण सापडले

नवी दिल्ली । लॉकडाऊन काळातही भारतातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा तेजीनं वाढताना दिसतोय. मे महिन्यात लॉकडाऊनच्या ४२ व्या (मंगळवार) दिवशीही दिसून आलेली ही वाढ लक्षणीय आहे. तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला असून तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील … Read more

केरळ विजयाच्या उंबरठ्यावर! ४९९ पैकी ४६५ कोरोनाबाधित झाले बरे; एकही नवा रुग्ण नाही

तिरुअनंतपुरम । देशात कोरोनाने सर्वात आधी ज्या राज्यातून घुसखोरी केली होती ते राज्य म्हणजे केरळ. मात्र, आता केरळ कोरोनाच्या लढाईत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. केरळ लवकरच या विषाणुला राज्यातून हद्दपार करणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. आता केरळमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून, गेल्या काही दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळलेला नाही. विशेष … Read more

‘या’ राज्यात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक

कोलकाता । देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत आहे. असे असले तरी मृत्यूचा दर काही प्रमाणात कमी होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असून या राज्यातील मृत्यूचा दर देशातील अन्य राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पश्चिम बंगाल राज्यात मृत्यूदर १२.८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. केंद्र सरकारची केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाच्या हे निदर्शनास आले … Read more