चिंता वाढली! देशात २४ तासांत 195 बळी, 3 हजार 900 नवे कोरोना रुग्ण सापडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाऊन काळातही भारतातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा तेजीनं वाढताना दिसतोय. मे महिन्यात लॉकडाऊनच्या ४२ व्या (मंगळवार) दिवशीही दिसून आलेली ही वाढ लक्षणीय आहे. तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला असून तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील ही सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेली आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 46 हजार 433 वर पोहचली आहे. यामध्ये 32 हजार 134 जणांवार सध्या उपचार सुरू आहेत. तर 12 हजार 727 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 568 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

गेल्या २४ तासांत कोरोनाचे 1,074 रुग्ण बरे झाले असून एकदिवसात बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 27.52 टक्के झाले आहे. एकूण 11,706 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली. देशभरातील 20 शहरांमध्ये केंद्रीय पथके पाठवून करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती सहसचिव अगरवाल यांनी दिली. करोनाच्या महासाथीचे शिखर मे-जूनमध्ये गाठले जाईल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. आणखी दोन आठवडे म्हणजेच 17 मेपर्यंत देशभरात लॉकडाउन कायम असणार आहे. त्यानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment