भारतात झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या, ICMR म्हणतेय ‘ही’ गोष्ट करणे गरजेचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) म्हणते की कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या जास्त चाचण्या घेणे महत्वाचे आहे कारण भारतातील रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. हे वक्तव्य अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा सरकार चीनकडून रॅपिड टेस्टिंग किट येण्याची वाट पाहत आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडी शोधण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट ५ एप्रिलला … Read more

तबलिगी जमातच्या मौलाना सादसह इतर तबलिगींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली । तबलिगी जमातीच्या सदस्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी मोठे पाऊल उचलत तबलिगींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अंतर्गत हेतुपुरस्सर नसलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह १ हजार ८९० जणांवर हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट वाढलं ते तबलिगी जमातच्या निजामुद्दीनमध्ये … Read more

मुंबईत करोना पॉझिटिव्ह महिलेची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई । राज्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीनं आत्महत्या केल्याची प्रकरण सुद्धा समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका २९ वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. … Read more

महाराष्ट्र लढतोय; कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंचे ७ दिलासादायक मुद्दे

टीम हॅलो महाराष्ट्र | उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधन करताना कोरोनाशी लढताना महाराष्ट्र कुठल्या पातळीवर काम करतोय, आणि सरकारची पुढील वाटचाल काय असेल यावर थोडक्यात भाष्य केलं. पाहुयात त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे. १) कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती, तज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभ्यासक एकत्र येऊन काम करणार. २) आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात … Read more

घबराना मत, चुनौती का सामना मिलकर करेंगे; उद्धव ठाकरेंचा परप्रांतीयांना दिलासा

टीम हॅलो महाराष्ट्र | देशातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहेत. त्या मजुरांना १४ तारखेला लॉकडाऊन हटेल असं वाटलं होतं म्हणून ते एकत्र आले होते. पण संचारबंदी वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांची निराशा झाली. पण राज्याचा प्रमुख म्हणून मी त्यांना आश्वासित करु इच्छितो की तुमची संपूर्ण काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे, तुम्ही अजिबात घाबरु नका. लॉकडाऊन झाल्यानंतर … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स काम करेल – उद्धव ठाकरे

टीम हॅलो महाराष्ट्र | परिस्थिती नियंत्रणात आली असली किंवा नसली तरी या लढ्याकडे गांभीर्याने पहावं लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय परिस्थिती आजही व्यवस्थित असून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सरकारतर्फे करता येणारे सर्व प्रयत्न सुरुच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीविषयी उद्धव ठाकरेंनी सविस्तर माहिती यावेळी दिली. कोरोनातून … Read more

मुंबईत दिवसभरात ११ जणांचा बळी, २०४ नवे करोनाबाधित

मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ … Read more

कोरोनामुळे कोल्हापूरी चप्पल व्यवसायाला तब्बल १ हजार कोटींचा फटका; मजुरांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फॅशन स्टेटमेंट म्हणून कोल्हापुरी चप्पल हा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे. थोरांपासून लहानपर्यंत कोल्हापूर चप्पल वापरायची क्रेज आहे. ज्या कोल्हापूरच नाव संपूर्ण जगात तिच्या सुबक आणि टिकाऊ चप्पलीमुळे पसरले त्या कोल्हापूरातील चप्पल … Read more

मदतकार्याचे गॉगल लावून फोटो कसले काढता? ही वेळ आहे का ती – राज ठाकरे

मुंबई । ‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं … Read more

भारतात ‘या’ ३ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत संपूर्ण देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यँत वाढवण्यात आला आहे. संपूर्ण देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. कोरोनाचे जास्तीत जास्त रूग्ण या ३ राज्यांमध्येच आहेत. याव्यतिरिक्त सर्वाधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे देशभरात झालेल्या मृत्यूंमध्ये निम्म्यापेक्षा जास्त … Read more