देशातील कोरोमाग्रस्तांची संख्या ४४२१ वर, आत्तापर्यंत ११४ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या वाढून ४४२१ झाली आहे, तर आतापर्यंत ११४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३२६ लोकांवर उपचार केले गेले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आले आहे. गेल्या २४ तासांत ५ मृत्यू आणि ३५४ नवीन रूग्ण झाले आहेत.सोमवारी सायंकाळपर्यंत, … Read more

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात आज नवीन २३ करोनाचे रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये सांगली १, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाणा२, मुंबई १०, ठाणे १ आणि नागपूर २ नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता ८९१ वर पोहोचला आहे. 23 new #Coronavirus positive cases reported … Read more

हनुमान जयंतीला घरातच थांबा, नाहीतर जालं पर्वत आणायला!- अजित पवार

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने वारंवार सांगूनही काही लोक घराबाहेर पडून गर्दी करताना दिसत आहेत. ताज उदाहरण म्हणजे पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारीच्या दिवे लावा कार्यक्रमाचा काही जणांनी रस्त्यावर येऊन मिरवणूक काढून फज्जा उडवला. त्यामुळं येत्या हनुमान जयंतीला तसंच शब्ब-ए-बारातला … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी; म्हणाले, औषध द्या नाहीतर..

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसने बलाढ्य अशा अमेरिकेला बेजार केलं आहे. कोरोनाने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले आहे. कोरोनाने अमेरिकेची कोंडी केली असून यातून सुटका करण्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाची गरज आहे. भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध साठा पुरवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

लोकांमध्ये आशा निर्माण करण्यासाठी बॉलिवूड स्टार्सनी शेअर केले ‘मुस्कुराएगा इंडिया’ अँथम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाला ब्रेक लागला आहे. कोरोना साथीमुळे जगातील बर्‍याच लोकांना आपले प्राणास मुकावे लागले. फक्त एक आशा आणि इच्छाशक्ती आहे जी आपल्याला एक राष्ट्र म्हणून मजबूत आणि एकजूट ठेवत आहे. आत्ता, सर्वत्र भीती व अराजकाचे वातावरण आहे, या वातावरणातही निर्माता जॅकी भगनानी, सुपरस्टार अक्षय कुमार, कार्तिक … Read more

१४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातील लॉकडाउन सरकारने उठवावा- राजू शेट्टी

कोल्हापूर । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहन वगळता राज्यात जिल्ह्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या १४ एप्रिलला घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन आणखी … Read more

पुण्यात नगरसेवकाकडून ४ हजार कुटुंबांना धान्य वाटप

पुणे । कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्या लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन वेळच्या जेवणाची त्यांना भ्रांत पडली आहे. अशावेळी पुण्यातील ४ हजार कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. गुलटेकडी भागातील डायस प्लॉट, मीनाताई ठाकरे वसाहत, संदेशनगर एसआरए झोपडपट्टीत आदी भागात हे धान्य वाटप करण्यात आलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने … Read more

लाॅकडाउननंतरही संचारबंदी कायम राहणार, १४ एप्रिलनंतर सरकारचा ‘हा’ प्लान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनपासून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने भारतासह जगभरातील देशांना वेढले आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण ४००० च्या वर गेले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज १३ वा दिवस आहे. बाजारपेठा बंद आहेत. गाड्या, बस, विमान, टॅक्सी, काहीही चालू नाहीये. अशा परिस्थितीत सरकार १५ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडण्याचा … Read more

भारतातील तापमानात होणार वाढ, कोरोनावर मात करायला होणार मदत?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांपासून जगात खळबळ उडाली आहे. चीनच्या वुहान येथून या विषाणूचा प्रसार होण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सुमारे १.३ दशलक्ष लोकांना याची लागण झाली आहे तर ७०,००० लोक मरण पावले आहेत. सुरवातीपासूनच असे म्हटले जात होते की वातावरणातील तापमान वाढले तर हा विषाणू संपेल. या दाव्यात किती सत्यता आहे,उन्हाळ्याच्या … Read more

कोल्हापूरात आणखी एक कोरोनाग्रस्त सापडला; संख्या ३ वर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३ वर गेली आहे. कसबा बावडा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आज नवा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.कोरोना बाधित महिला ही कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील … Read more