महाराष्ट्रात ४३१ नवे करोना रुग्ण, १८ जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या ५६४९वर

मुंबई । राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यभरात नवीन ४३१ रुग्ण सापडले. त्यामुळं रुग्णांची संख्या आता ५ हजार ६४९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज १८ जण दगावले आहेत. आज ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या … Read more

केंद्र सरकारचे आदेश डावलून विमान कंपन्यांची तिकिट बुकिंग सुरु

नवी दिल्ली । केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जोपर्यंत करोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येत नाही तोपर्यंत एकही विमान उड्डाण घेणार नाही, असे स्पष्ट केले होते. सध्या देशात करोना विषाणूची साथ रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र तरीही विमान कंपन्यांकडून मे आणि जून महिन्यातील आगाऊ तिकीट बुकिंग स्वीकारली जात असल्याचे समोर … Read more

कोरोनाच्या उपचारात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन फायदेशीर ठरली नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरिया विरोधी औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे ‘गेम चेंजर’ म्हणून वर्णन केले असेल, परंतु कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या उपचारामध्ये हे औषध फायदेशीर ठरलेले नाही हे एका संशोधनातून दिसून आले आहे. मेडआर्चिव्हच्या प्रीप्रिंट रेपॉजिटरीमध्ये प्रकाशित केलेल्या निष्कर्षांनुसार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनने उपचार घेतलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढला. अभ्यासासाठी, संशोधकांनी ११ एप्रिल पर्यंत, … Read more

कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये; गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान

नवी दिल्ली । ”आपला देश करोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये” असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजपा नेत्यांचे कानच टोचले आहेत. “एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे, असं गडकरी यांनी एका मराठी … Read more

आपल्या चप्पलांसोबत कोरोना घरात येऊ शकतो काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या ३५ लाख ६० हजारांच्या वर गेलेली आहे, तर १ लाख ७७ हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अशा परिस्थितीत, विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीवर काम करण्याबरोबरच हे व्हायरस किती काळ टिकू शकते जेणेकरून संसर्ग थांबवता येईल, हे पाहिले जात आहे. दरम्यान, पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित होतो आहे … Read more

करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण नक्की जिंकू- नितीन गडकरी

नवी दिल्ली । जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या लढाईत पुढे आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ तसंच करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वास … Read more

नवी मुंबईतील आयटी कंपनीत १९ जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी मुंबई । नवी मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज आणखी २० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका आयटी कंपनीच्या १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेने एमआयडीसीतील विशेष करून आयटी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. महापे येथील एका आयटी कंपनीत लॉकडाउन असूनही काम सुरू … Read more

कोरोनावरुन अमेरिकेत चीन विरुद्ध पहिली केस दाखल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला धोक्यात आणल्याच्या आरोपावरून चीनविरूद्ध अमेरिकेत पहिला दावा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चीनविरूद्ध कायद्याचा आधार घेणारे मिसुरी हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे.या खटल्यात चीनने कोरोना विषाणूची जाणीवपूर्वक माहिती लपवून ठेवली,याबाबत सतर्क करणाऱ्यांना अटक केली आणि हा आजार संसर्गजन्य असल्याची शक्यता नाकारल्याचा आरोप करण्यात आला आणि … Read more

राज्य करोनाशी लढतंय अन् भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय, रोहित पवार भडकले

मुंबई । राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपाच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय अशा शब्दात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या कोरोना संकट काळातील भूमिकेवर आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झाला असून त्याविरोधात एका भाजपा नेत्याने उच्च न्यायालयात … Read more

उद्धव-देवेंद्र यांच्या शासकीय निवासात कोरोनाचा शिरकाव; पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर तैनात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महिला कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या दोन्ही शासकीय निवास्थानावरील तैनात असलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास … Read more