कोरोनाच्या संकटात सोनिया गांधींनी पत्रातून केल्या मोदींना ‘या’ ५ सूचना

नवी दिल्ली । देशभरात करोनाचे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. देश एका मोठ्या महामारीचा सामना करतो आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोनाशी लढण्यासाठी आपण निधी कसा वाचवू शकतो याबाबत ५ महत्वाच्या सूचना केल्या आहेत. करोनामुळं देशावर आर्थिक संकट तयार झालं असून मोदी सरकारने करोनाशी लढण्यासाठी आणखी कठोर निर्णय … Read more

डिसेंबरपासून पहिल्यांदाच चीनमध्ये कोरोनाच्या आजाराने मृत्यूची एकही घटना घडली नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी चीनमध्ये पहिल्यांदाच कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या आजाराने मृत्यूची एकही घटना घडली नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने म्हटले आहे की जानेवारीपासून चीनने या संदर्भात डेटा प्रकाशित करण्यास सुरवात केली. या प्राणघातक विषाणूमुळे कोणीही मरण पावला नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्चपासून चीनच्या प्रदेशात संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी परदेशातुन आलेल्या … Read more

WhatsApp ने कोरोना पार्श्वभुमीवर केला ‘हा’ मोठा बदल, एका वेळी एकालाच फोरवर्ड करता येणार मेसेज

वृत्तसंथा । सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्यासाठी WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकाचवेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणाऱ्या फेक मेसेजेसला रोखण्यासाठी WhatsApp कंपनीने ही नवीन मर्यादा घातली आहे. … Read more

भारतात वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये जास्त फोफावतोय कोरोना!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन असूनही भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४००० च्या वर गेली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही १११ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की संसर्ग झालेलं ४१.९% लोक २१ ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. याव्यतिरिक्त, ३२.८% रुग्ण ४१ ते ६० या वयोगटातील होते. त्याच वेळी केवळ … Read more

खासदारांनंतर आता आमदारांचीही वेतन कपात होणार?

मुंबई । कोरोना व्हायरसने देशभरात घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या ३० टक्के वेतन कपातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आमदारांचीही वेतन कपात होण्याची शक्यता आहे. खासदारांप्रमाणे आमदारांची पगार कपात व्हावी अशी मागणी शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केली आहे. संकटात आमदार आणि खासदार यांनी पुढे आलं पाहिजे. मंत्रीमंडळ यासंबधी निर्णय घेईल असं अनिल … Read more

देशातील कोरोमाग्रस्तांची संख्या ४४२१ वर, आत्तापर्यंत ११४ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या वाढून ४४२१ झाली आहे, तर आतापर्यंत ११४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३२६ लोकांवर उपचार केले गेले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आले आहे. गेल्या २४ तासांत ५ मृत्यू आणि ३५४ नवीन रूग्ण झाले आहेत.सोमवारी सायंकाळपर्यंत, … Read more

VIDEO: जर मला काही झालं तर.. असं म्हणताच ‘त्या’ महिला डॉक्टरचे डोळे पाणावले

वृत्तसंस्था । देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून आज अनेक डॉक्टर, नर्स, वैद्यकीय, कर्मचारी, पोलीस कोरोनाशी लढत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये व्यस्त असणार्‍या या लोकांचे मनोबल वाढतच आहे. यात डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेक डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब राहून रूग्णांवर उपचार करीत … Read more

मुंबई महापालिकेनं केले तबलिगी जमातच्या १५० जणांवर गुन्हे दाखल

मुंबई । दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्यांनाइशारा देऊनही स्वत:हून पालिकेसमोर न येणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात मुंबई महापालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपर्कातील असून इतर रुग्ण हे केवळ १० टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईतील … Read more

अमेरिकेत कोरोना व्हायरसचा कहर, मृत्यूंचा आकडा १० हजार पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसने सोमवारी मरणाऱ्या लोकांच्या संख्येने १०,०००चा आकडा ओलांडला आहे. सोमवारपर्यंत या खतरनाक विषाणूंमुळे १०,८०० लोक मृत्यूमुखी पडले आणि ३,६६,००० लोक या विषाणूपासून संसर्गित आहेत. अमेरिकन वैज्ञानिक यावर लस विकसित किंवा यशस्वीपणे चाचणी घेण्याच्या शोधात आहे. १३ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झालेला आहे तर एकूण ७४,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू … Read more

आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सरकारकडून लोकांना घरातच बसण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर जयंती आणि फुले जयंती साजरी करण्याबाबत एक महत्वाचं आवाहन राज्यातील जनतेला केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा आंबेडकर आणि फुले … Read more