टी -२० वर्ल्ड कप कोरोनाव्हायरसमुळे पुढे ढकलला जाणार ? आयसीसीने केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कहराने संपूर्ण क्रीडा जगात शांत झाले आहे, त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी -२० वर्ल्ड कपचे आयोजनही धोक्यात आले आहे. क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये अशी बातमी आहे की ज्या प्रकारे हा साथीचा रोग जगभर पसरत आहे,त्यामुळे असे दिसते आहे की ही स्पर्धादेखील पुढे ढकलण्यात येईल,परंतु आता आयसीसीने यावर निवेदन जरी करून सर्व … Read more

कोरोना विषाणूमुळे देशभरात आणीबाणी लागू केल्याची जपानची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी गुरुवारी संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.या घोषणेसह प्रादेशिक राज्यपाल हे नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करू शकतात,परंतु कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करू शकत नाही.अशा प्रकारे,जगातील इतर देशांतील कडक लॉकडाउनपेक्षा ही व्यवस्था खूपच कमकुवत आहे.अ‍ॅबे यांनी यापूर्वीच टोकियोसह सात … Read more

पाकिस्तानसाठी आयएमएफकडून १.४ अब्ज डॉलर्सची मदत मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गुरुवारी कोरोना व्हायरस जागतिक साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानला सुमारे १.४ अब्ज डॉलर्सच्या आपत्कालीन मदतीस मान्यता दिली आहे.या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तान आता या जागतिक महामारीच्या विरोधातील आपली लढाई आणखी चांगल्या पद्धतीने करू शकेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एका निवेदनात म्हटले आहे की, कोविड -१९च्या या अत्यंत अनिश्चिततेच्या … Read more

भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे

वृत्तसंस्था । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशात भारतीय लष्करात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. लष्करातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी दिली आहे. लष्कर प्रमुख नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी … Read more

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज प्रथमच घट; काल रात्रीपासून आढळले फक्त ६ रुग्ण

मुंबई । कोरोनाशी प्रखर लढा देणाऱ्या राज्य सरकारला दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन किंवा तीन अंकी आकड्यांमध्ये रुग्ण वाढ नोंदवणाऱ्या मुंबईतील बाधितांच्या संख्येत आज प्रथमच घट झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. … Read more

कोरोना संकटात भारत पाठवतोय ५५ देशांना औषध, पाकिस्तानचे नाव नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अमेरिका, इटली, ब्रिटन सारखे बलाढ्य देशही आता असहाय झाल्याचे दिसून येत आहे.अशा परिस्थितीत भारत जगातील बर्‍याच देशांना मदत करत आहे. आवश्यक औषधे व रसद भारतातून बड्या व छोट्या देशांमध्ये पाठविली जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारात प्रभावी मानले जाणारे मलेरिया वरचे औषध हायड्रोक्सीक्लोरोक्वीन एचसीक्यू इतर … Read more

देशातील १७० ‘हॉटस्पॉट’पैकी मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे

मुंबई । देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर … Read more

मेढा नगरपंचायतच्या ‘त्या’ नोटीसाला व्यापाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

सातारा प्रतिनीधी । जिल्ह्यातील जावली तालुक्यातील निझरे गावमध्ये कोरोनाचे ३ पाॅझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. मुंबईवरून आलेल्या या रुग्णांच्या संपर्कात आल्याने सतर्कतेची गरज वाढली आहे. या पार्श्वभुमीवर मेढा नगरपंचायतने मेढा नगरपंचायतच्या हद्दीतील सर्व किराणा व भाजीपाला विकणार्या व्यापाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करुन घेण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र दोन ते तीन व्यापाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र नगरपंचायतला दिले … Read more

कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलचे २० कर्मचारी क्वारंटाईन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत आणखी एकाला कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झालं होतं मात्र यामुळं संबंधित रुग्णावर उपचार करणारा सीपीआरमधील स्टाफही कोरोना संशयितांच्या यादीत आला आहे. 18 ब्रदर आणि नर्सेस सह दोन कर्मचाऱ्यांवर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. या 20 जणांचे स्वॅब आज सकाळी घेण्यात आले असून ते तपासणीसाठी … Read more

फडणवीस साहेब, ही वेळ राजकारणाची नाही एकत्र येऊन लढण्याची आहे – अशोक चव्हाण

मुंबई । ”मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की, ही ब्लेमगेमची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे. करोनाचं संकट संपल्यावर ते करू. विधानसभा निवडणुका लागल्यावर ते करू. त्यावेळी आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ.” असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य … Read more