कोरोनाच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड कोटी जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २५ लाख सीपीआर आणि २५ लाख ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात … Read more

लॉकडाऊनमुळ दूध संघांसमोर अडचणी; लाखो लिटर दूध वितरणाविना शिल्लक

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनामुळे संचारबंदी लागू केल्यानंतर मुंबई पुण्यातील मोठी हॉटेल्स बंद झाल्याने पुणे विभागातून संकलित होणाऱ्या २१ लाख लिटर दुधापैकी एक लाख लिटरच्या आसपास दूध शिल्लक राहण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा अनुभव सहकारी दूधसंघांना आला असून भविष्यात खासगी संघांच्या संकलनावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे विभागातून गोकुळ, राजारामबापू सहकारी संघ, कात्रज, … Read more

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सचिन तेंडुलकरने दान केले ५० लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोविड -१९ या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. अनेकांनी पगार देण्याचे जाहीर केले आहे, तर अनेकांनी वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचे तांदूळ … Read more

आधी देश, नंतर IPL चा विचार करु! रोहितचा चहलला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला आहे. जगातील सर्वात मोठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. भारताचा विचार करता भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धा आयपीएल येत्या २९ मार्चपासून सुरु होणारी होती. मात्र, करोनाच्या संकटामुळं बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाला … Read more

ईएमआयबाबत सल्ला देऊन बँका ऐकणार नाहीत स्पष्ट निर्देश द्या! अजित पवारांची आरबीआयला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा केली. तसेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो असंही गव्हर्नर दास यांनी सांगितलं आहे. यासोबत रिझर्व्ह बँकेने बँकांना तीन महिने ईएमआयची वसुली स्थगित … Read more

संकटाच्या काळात खासगी डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करू नये- आरोग्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहन राज्यातील खासगी डॉक्टरांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोनाच्या भीतीपोटी रुग्णालयं बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य … Read more

गुड न्यूज! राज्यात १९ रुग्ण कोरोनामुक्त; देण्यात आला डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर करोनापासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 19 झाला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. काल,पुणे 1,सांगली 3, कोल्हापूर 1,नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. यामध्ये … Read more

अबब! अमेरिकेत कोरोनाचे ७० हजारहून अधिक रुग्ण, १००० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अमेरिकेत कोरोनाव्हायरसने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ७० हजारांवर गेली आहे, तर या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा एक हजारापेक्षा जास्त झाला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजीनियरिंगने (सीएसएसई) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी दुपारी १.४५ पर्यंत कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या आतापर्यंत ७५,२३३ आहे. आतापर्यंत १,०७० … Read more

चैत्र वारीसाठी कोणीही दिंडी पंढरीत घेऊन येऊ नका!वारकरी संप्रदाय पाईक संघाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र वारीसाठी राज्य तसेच शेजारील राज्यातील भाविकांनी पंढरीत येऊ नये असं आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत महाराज वासकर आणि महाराज मंडळीनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. करोनाचा संसर्ग फैलाऊ नये म्हणून लोकांची गर्दी टाळण्यासाठी राज सरकारने सर्व प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याचा आदेश … Read more

ट्रेनमध्येच उभारणार रुग्णालय; मोदी सरकारची योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसात करोनाचा प्रादुर्भाव देशातील ग्रामीण भागाला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन खबदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारनं रेल्वेतच वैद्यकीय सुविधां पुरवण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. … Read more