३ मेपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशवासीयांच्या अडचणी लक्षात घेऊनच देशातील संचारबंदी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी आज जाहीर केला. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. कोरोनाशी संबंधित हॉटस्पॉटवर लक्ष देण्यात येत असून ज्या ठिकाणी २० एप्रिलपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाहीत तिथे अत्यावश्यक सुविधा चालू करण्यात येतील … Read more

साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी माहिती घेणे हाच खात्रीशीर उपाय – सौम्या स्वामिनाथन

इतर वैद्यकीय उपाय एकत्रितपणे केल्याशिवाय केवळ संचारबंदी हा एकमेव उपाय या साथीच्या आजाराच्या काळात प्रभावी ठरणार नाही.

मास्क न घालणे एका पुणेकराला पडलं चांगलंच महागात

पुणे प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. प्रशासनाने याबाबत नियम सुद्धा घालून देत घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केलं आहे. याहीपेक्षा आपल्या आणि समाजाचे आरोग्याची काळजी घेत एक जबाबदार नागरिक म्हणून मास्क वापरणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र, तरीही बरेच नागरिक बेफिकिरीने घराबाहेर पडत आहेत. पुण्यात मास्क न लावत बाहेर … Read more

सोनिया गांधींचे मोदींना भावनिक पत्र; म्हणाल्या हातावर पोट असलेल्यांची काळजी घ्या

वृत्तसंस्था । देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग बंद आहते. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर होत आहे. रोज कमावून खाणाऱ्या अशा लोकांना आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीत अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या, या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया … Read more

आता विमानप्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ३ टक्क्यांनी तिकीट दर वाढणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन उघडल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई प्रवासाचे भाडे अनेक पटींनी वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोशल डिस्टंसिंग लक्षात घेऊन एअरलाइन्स आपला प्रवास एकूण जागेच्या एक तृतीयांश ऑक्यूपेंसीसह ऑपरेट करतील,ज्यामुळे आधीच्या तुलनेत हवाई प्रवासावर ३ पट जास्त खर्च करावा लागेल. विमान वाहतूक प्राधिकरण एका नवीन विकल्प लागू … Read more

कोरोनाच्या संकटात भारताला गुगलच्या CEOने केली तब्बल इतक्या कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक मदत करत आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला ५ कोटी इतकी मदत दिली आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत मोठ्या व्यक्ती आणि उद्योग संघटना केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. भारतीय स्टार, … Read more

खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील शास्त्रज्ञ कोविड-१९ वरील लस आणि औषध तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. या प्रकरणात, भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसवरच्या संभाव्य प्रभावी औषधाविषयी एका अभ्यासाच्या निकालांच्या आधारे महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. समुद्री लाल शैवालांपासून तयार केलेली संयुगे सॅनिटरी वस्तूंवर लेप म्हणून वापरले जाऊ शकतात आणि जी कोविड -१९ शी लढण्यासाठी अँटीव्हायरल औषधांच्या निर्मितीमध्ये … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ९१५२ वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढतच आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड -१९ चे ७९८७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ९१५२ संसर्ग झालेल्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८५६ जण ठीक अथवा डिस्चार्ज करण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये … Read more

कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेऊ- उदय सामंत

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं राज्यातील महाविद्यालय, विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यानं या परीक्षा कधी होणार हा एकाच प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. कोरोनामुळं संपूर्ण शैक्षणिक सत्राच वेळापत्रक कोलमडल आहे. याच थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे. अशा संभ्रमाच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी ग्वाही माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री … Read more

जितेंद्र आव्हाड ‘होम क्वारंटाइन’, कोरोना पोझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने निर्णय

मुंबई । वैद्यकीय तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला ‘होम क्वारंटाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्य काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. खुद्द आव्हाड यांनीही ‘होम क्वारंटाइन’च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथे कार्यरत असणारा एका पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं … Read more