शहरात लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पूर्ण

औरंगाबाद – दिवाळीच्या सणामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती मंदावली होती. मात्र ‘हर घर दस्तक’ मोहिमेमुळे पुन्हा एकदा लसीकरचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी शहरात लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पूर्ण झाला. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आठ नोव्हेंबरपासून हर घर दस्तक मोहीम सुर करण्यात आली. त्यात आशा स्वयंसेविकांमार्फत 23 हजार 15 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शुक्रवारी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ आता मनपाचा मोठा निर्णय !

औरंगाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर पर्यंत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यानंतर ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांना दुकान, मॉल, हॉटेल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे प्रवेश मिळणार नाही. तसेच पेट्रोल पंपावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल मिळणार … Read more

औरंगाबादेत आता ‘नो व्हॅक्सिन नो रेशन’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद – राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील फक्त 55 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या अत्यंत कमी म्हणजे 22 टक्के एवढीच आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के … Read more

प्रवास, गर्दी टाळा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Sunil chavhan

औरंगाबाद – सणासुदीच्या काळाला प्रारंभ झालेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करत समाजात वावरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. प्रवास करण्यामुळे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळे आणि कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे … Read more

दीड वर्षानंतर महाविद्यालये अनलॉक; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद – कोरोना वर लोक डाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना मागील दीड वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाची बंद असलेली महाविद्यालयांची द्वारे अखेर आज उघडली. यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविद्यालयात 50 टक्के क्षमतेने वर्ग भरविण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धत वापरण्यात आली. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन … Read more

शिक्षकांना पगार बिलासोबत आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागणार

औरंगाबाद – शिक्षकांना पगार बिल सादर करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करावे लागेल. असे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती सोमवारी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शाळा दीड ते दोन वर्ष बंद होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

जिल्ह्यातील सहा लाख नागरिक लसवंत

औरंगाबाद – कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात … Read more

आरोग्य विभागाचा गोंधळ ! एकाच युवकाचा अहवाल परभणीत पॉझिटिव्ह तर जालन्यात निगेटिव्ह

Corona Test

परभणी – जिल्ह्यातील मानवत येथील युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह तपासणी अहवाल प्रकारणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. परभणीच्या खासगी व जिल्हा शासकीय प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटिव आलेल्या तरुणाने या अहवालाला आव्हान देत जालना येथील शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, त्या ठिकाणी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे‌‌. घशातील लाळेचा किंवा नाकातील नमुना न घेता केवळ मोबाईल क्रमांक … Read more

लसीकरणासाठी आजपासून मनपाचेही ‘मिशन कवच कुंडल’

corona vaccine

औरंगाबाद – कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात महापालिकेने शहरात 20 लसीकरण केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी … Read more

नगरहून येणाऱ्या नागरिकांची होणार कोरोना चाचणी, जिल्ह्याच्या सीमेवर उभारणार तपासणी केंद्र – जिल्हाधिकारी

Corona Test

  औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने कहर केला आहे. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. येथील रुग्णांचा संसर्ग औरंगाबाद जिल्ह्यात होऊ नये, यासाठी नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरणा तपासणी केली जाणार … Read more