Thursday, March 30, 2023

शिक्षकांना पगार बिलासोबत आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागणार

- Advertisement -

औरंगाबाद – शिक्षकांना पगार बिल सादर करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करावे लागेल. असे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती सोमवारी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शाळा दीड ते दोन वर्ष बंद होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्याने ग्रामीण भागासह शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता मुलांना शाळेत येतांना पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे, शाळांचे निर्जुंतुकीकरण आवश्यक आहे. मात्र आदेश देवूनही अनेक शिक्षकांचे लसीकरण झालेले नव्हते. तर काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने घेतलेल्या माहितीत दोन हजार शिक्षकांचा लसचा दुसरा डोस बाकी होता. विद्यार्थी सुरक्षिततला लक्षात घेता आता शिक्षकांना त्यांचे पगार बिल सादर करतांना सोबत कोरोना प्रतिबंधात्मक लसचे दोन्ही डोस घेण्याल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असेही चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

 

एकूण शाळांची संख्या ही २१३८ आहे. तर विद्यार्थी संख्या ही २ लाख ६६ हजार ८९ असून, शिक्षकांची एकूण संख्या ही १० हजार ७८३ आहे. शहरातील मिळून एकूण शिक्षक संख्या ही अठरा हजार आहे. कोविड १९ च्या नियमांचे पालन करतांना शाळांनी शिक्षकांचे लसीकरण करुन घेणे देखील आवश्यक असल्याचेही गटणे म्हणाले त्याशिवाय शाळेत येता येणार नाही अशा सूचना देखील यापूर्वीच कोविड १९ च्या नियमात शाळा सुरु होतांना दिलेल्या आहेत.