नामुष्की व्हाइटवॉशची! दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने केला ७ गडी राखत भारताचा पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही २-० असा विजय मिळवून न्यूझीलंडने भारताला व्हाइटवॉश दिला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवर आटोपला. भारतानं दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा … Read more

२० वर्षांच्या अपेक्षांचं ओझं उतरवून देशाच्या खांद्यावर विराजमान झालेला सगळ्यात महत्त्वाचा क्षण..!!

सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला पूर्ण जग ओळखतं अशा या विक्रमादित्याच्या आठवणीही तितक्याच रंजक आणि रोमांचकारी आहेत.

भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला केले २ धावांनी पराभूत…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिरकी गोलंदाज पूनम यादवच्या तीन बळींच्या जोरावर भारताने मंगळवारी आयसीसी महिला टी -२० विश्वचषक सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध दोन धावांनी रोमांचक विजय नोंदविला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजीस उतरला आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघासमोर विजयासाठी निर्धारित २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावांची नोंद केली. लक्ष्य … Read more

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more

25 धावा करताच विराट कोहली मोडणार टी -20 मधील धोनीचे रेकॉर्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली बुधवारी हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मोठा विक्रम नोंदवणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणखी 25 धावा जमविल्यास तो कर्णधार म्हणून टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे रेकॉर्ड मोडेल. टी -20 आंतरराष्ट्रीय मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत कोहली … Read more

के.एल.राहुलची जिगरबाज खेळी पाहून सेहवाग रिषभ पंतला म्हणाला, पंतला केवळ बोलायला जमतं!

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्‍या टी -२० सामन्यात भारताने ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने भारतासमोर ठेवलेलं १३३ धावांच भारतीय संघाने केवळ १७.३ षटकांत गाठले. भारताचा हा विजय के. एल राहुलच्या झुंझार खेळीने साकारला गेला. या सामन्यात के एल राहुलने ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्य. केएल राहुलच्या सामन्यातील कामगिरीमुळं प्रभावित झालेल्या माजी क्रिकेटर वीरेंदर सेहवागने राहुलचे कौतुक करताना रिषभ पंतवर टीका केली.

कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावांचा टप्पा पार करणारी टीम बनली इंग्लंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : इंग्लंड क्रिकेट संघ कसोटीत 500,000 धावा करणारा जगातील पहिला संघ बनला आहे. जोहान्सबर्गच्या वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने हे कामगिरी केली. इंग्लंडने त्यांच्या 1022 व्या कसोटी सामन्यात हा विक्रम केला आहे. त्याचबरोबर 830 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया 432,706 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारत 540 कसोटी सामन्यात … Read more

भारत आशिया चषकात न खेळल्यास, आम्ही 2021चा टी -20 वर्ल्ड कप खेळणार नाही: पीसीबी

भारत पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये आयोजित आशिया कपमध्ये बीसीसीआयने भारतीय संघ पाठविण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आज पीसीबीचे अध्यक्ष वसीम खान यांनी भारत या स्पर्धेत सहभागी न झाल्यास २०२१ मधील ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी नकार देईल असं आयसीसीला कळवलं आहे.

मी बुमराहसारखी बॉलिंग करू शकतो; आम्हाला व्हिडीओ पुरावा हवा – ICC

बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेंगळुरू येथे तिसरा आणि अखरेचा सामना सुरु आहे. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच हटके प्रयोग करत आले आहेत. अशाच क्रिएटिव्ह प्रेक्षकाने हातात धरलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. मी जसप्रीत बुमराहसारखी बॉलिंग करू शकतो या अर्थाचे ते पोस्टर … Read more

सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम नावे असणाऱ्या कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुश गोलंदाज अशी ओळख असलेल्या बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बापू नाडकर्णी पवईतील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. बापूंच्या निधनाने एक बुजुर्ग आणि भारतीय क्रिकेट विश्वातील जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे.