Sunday, April 2, 2023

वर्ल्ड कप २०११: जेव्हा सचिनने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करून त्यांना आणखी एका वर्ल्डकप सामन्यात पराभूत केले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन संघांचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहते मैदानावर मोठ्या संख्येने पोहोचतात. तथापि, राजकीय कारणांमुळे आता फक्त आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतच या दोन्ही संघांना सामना करावा लागतो. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानचा रेकॉर्ड भारतापेक्षा खूपच खराब राहिला आहे. भारतासमोर झालेल्या या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानला अनेकदा पराभवाचा सामना करावा लागतो. २०११ च्या विश्वचषक उपांत्य सामन्यातही असेच काहीसे घडले जेव्हा भारताने पाकिस्तानला २९ धावांनी पराभूत केले.

वर्ल्ड कप २०११ भारतीय उपखंडात खेळला गेला. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि ५० षटकांत ९ विकेट्सवर २६० धावा केल्या. भारताकडून सचिन तेंडुलकरने ११५ चेंडूंत ८५ धावांची अप्रतिम खेळी खेळली, ज्यावर भारत या धावा करण्यास यशस्वी ठरला. सचिन व्यतिरिक्त कोणताही खेळाडू अर्धशतकदेखील झळकावू शकला नाही.

- Advertisement -

पाकिस्तानला ३०० चेंडूंमध्ये २६१ धावांची गरज होती, पण हे लक्ष्यही त्यांना सोपे नव्हते कारण एकतर विश्वचषक उपांत्य सामना आणि दुसरे म्हणजे समोर भारतीय संघ.२६१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली, परंतु त्यांचे सर्व फलंदाज गडी गमावू नयेत म्हणून जास्तीत जास्त चेंडू खेळत होते.९ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानने ४४ धावा केल्या तेव्हा पाकिस्तानला पहिला धक्का बसला.

यानंतर पाकिस्तानच्या विकेट ठराविक अंतराने पडत राहिल्या आणि विकेट वाचविण्याच्या प्रयत्नात खेळाडू चेंडू खेळत राहिले. एक वेळ अशी होती की पाकिस्तानने ३३ व्या षटकात केवळ १४४ धावा केल्या होत्या आणि त्यांचे ५ खेळाडू पॅव्हिलियनमध्ये परतले होते. अखेरच्या १७ षटकांत पाकिस्तानला ११७ धावांची आवश्यकता होती.

पाकिस्तानची संपूर्ण टीम धावांच्या ओझ्याखाली आली आणि पूर्ण ५० षटकेही खेळू शकली नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९.५ षटकांत २३१ धावांवर गुंडाळला गेला. भारताकडून झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते .अशाप्रकारे, सामनावीर ठरलेल्या सचिन तेंडुलकरच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा २९धावांनी पराभव केला आणि विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर

Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन