बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती, ३ महिन्यांनंतर प्रकार उघडकीस

 एका अज्ञात नराधमाने केलेल्या बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती झाल्याची घटना जामखेड तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडितेच्या मतिमंदपणाचा फायदा घेत हा अज्ञात नराधम गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ओमराजेंनी भाजप संपवली म्हणून हल्ला केला!’ हल्लाखोर टेकाळेचा ओमराजेंवर आरोप

कळंब तालुक्यामध्ये भाजपला कमी समजलं जातं. ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्यातून भाजपा संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावरील या रागामुळंच मी ओमराजेंवर हा हल्ला केला असा आरोप ओमराजेंवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेने केला आहे. सोबतच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

अरे ही कसली दोस्ती! कमी मटण खाल्लं म्हणून मित्रालाच पेटवले

अहमदनगर मध्ये मंत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी अशी एक घटना घडली की तिने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीय.त्यामुळे हे नेमकं मित्र म्हणायचे की हत्यारे हा प्रश्न उपस्थित होतो.

ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणार्‍याचं भाजप कनेक्शन

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी गावात जीवघेणा हल्ला झाला. महायुतीचे विधानसभा उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ओमराजे गावात आले असताना अजिंक्य टेकाळे या तरुणाने हस्तांदोलन करताना अचानकपणे ओमराजेंवर चाकू हल्ला केला. यामध्ये ओमराजेंचं घड्याळ आडवं आल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. घटनास्थळावरून हा तरुण लगेच पसार झाला मात्र पोलीसांनी त्याला त्याच्या घरी जाऊन अटक केली आहे.

सांगलीत बंद बंगला फोडून, पाच लाखांची घरफोडी

सांगली शहरातील नवीन बायपास रोडवर असणाऱ्या व्यंकटेश सृष्टी मध्ये बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी तब्बल पाऊणे पाच लाख रुपयांच्या दागिन्यांसह, मनगटी घड्याळ लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याबाबत मिलिंद मछिंद्र लभाने यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

धक्कादायक !! पोलीस ठाण्यातच केली मेव्हण्याने जावयाची हत्या

आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संशयावरून भावाने आपल्या जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश कोळेकर असे मयत जावयाचे नाव असून रवींद्र उर्फ योगेश असे आरोपी मेव्हण्याचे नाव आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यातच घडली.

संपत्तीच्या वादातून मुलीनेच केला बापाचा खून

संपत्तीच्या वादातून मुलीनेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात घडली. बाबुराव कंकाल असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी रेश्मा बाविस्कर असे मृत बाबुराव यांच्या मुलीचे नाव आहे.

धक्कादायक!! जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा केला पीडितेवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर पूर्वी बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या नराधमाने जामिनावर सुटून आल्यावर केस का केली? असे म्हणत पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घडली. सागर सुनील श्रीसुंदर (रा शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे. या नराधमावर याआधी सदर पीडित अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून बलात्कार केल्याचा छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सांगलीत प्रेमप्रकरणातून गळा आवळून तरुणीचा निर्घृण खून

सांगली बसस्थानकासमोरील असणाऱ्या ”टुरिस्ट लॉज” मध्ये एका १९ वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. दुपारच्या सुमारास खुनाची घटना घडली असावी असा अंदाज आहे. कोल्हापूर रोड येथे राहणारी १९ वर्षीय वृषाली अर्जुन सूर्यवंशी असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून प्रियकर आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश हत्तेकर यानेच खून केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं असून, खून केल्यानंतर तो फरारी झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.