Breking | पुण्यात भिंत कोसळून १६ ठार

पुणे प्रतिनिधी | दिवसभर पडलेल्या पावसाने पुण्यात कोंढवा परिसरात आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १६ जण ठार झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. हि घटना बडा तलाव मस्जिद परिसरात घडली आहे. अग्निशामक दलाच्या वतीने आणि एनडीआरएफ (NDRF)च्या वतीने बचाव कार्य वेगात केले जात आहे. या ठिकाणी १८ जण राहत होते. त्या पैकी एक व्यक्ती … Read more

अनैतिक संबंधातून चाकूने सपासप वार करून खून

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  संजयनगर येथील साईनगरमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा गुंडाकडून निर्घृण खून करण्यात आला. पांडुरंग तुकाराम गलांडे (वय 39, रा. रामरहीम कॉलनी) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गुंड गबर्‍या ऊर्फ विश्‍वजित नामदेव माने (वय 29) याला अटक करण्यात आली आहे.  याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

कराडचा जवान पंजाबमध्ये शहीद

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड तालुकयातील पाचुंद येथील जवान विठ्ठल महादेव जाधव (वय २६) पंजाब येथील फिरोजपूर सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. विठ्ठल जाधव २०१५मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते. राजस्थान येथे त्यांचे पहिले पोस्टिंग झाले होते. तिथे त्यांनी दोन वर्षे सेवा बजावल्या नंतर त्यांची पंजाब येथे बदली झाली होती. गेली दोन वर्षे … Read more

कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून

Untitled design

पुणे प्रतिनिधी |इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याचा प्रकार सुसंस्कृत पुण्यात घडला आहे. पुण्याच्या कात्रज परिसरात सच्चाई माता परिसरात एका घरात इस्टेट एजंटचा मृतदेह आढळण्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची चौकशी सुरु केली आहे. अजय जयस्वाल (वय ४२, सध्या राहणार कोथरूड) या इस्टेट एजंटचा निर्घृण … Read more

पाचोऱ्याचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांचे निधन

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी पाचोऱ्याचे माजी आमदार तथा निर्मल सिड्सचे कार्यकारी संचालक आर.ओ. पाटील (रघुनाथ ओंकार पाटील) यांचे स्वादु पिंडाच्या कर्करोगाशी १ महिना २५ दिवस झुंज देत असतांना आज (दि. २८) पहाटे ४:३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुंबई हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. आर.ओ. पाटील महाराष्ट्र विधान सभेचे २ वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी … Read more

रेल्वे कर्मचार्‍यांचा देशातील एकमेव संप घडवून आणणार्‍या माजी केंन्द्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी | समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस वय 88 यांचे आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानंतर निधन झाले. साथी जॉर्ज यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा पाच दशकांचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला आहे. जॉर्ज नावाचे वादळ आज अखेर शांत झाले. गेली काही वर्षे ते अल्झायमर या आजाराने ग्रस्त होते. देशातील अनेक आंदोलनांचे नेतृत्व केलेले … Read more

क्रिकेटचे भीष्माचार्य पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांचे निधन

Achrekar

मुंबई प्रतिनिधी । क्रिकेटचे भीष्माचार्य ज्यांना द्रोणाचार्य,पद्मश्री अशा पुरस्कारांनी गौरविलेले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाने एक उत्तम मार्गदर्शक गमावला आहे. रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपणारे क्रिकेटपटू आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने घडवले होते. मार्गदर्शकाच्या भूमिकेतील आचरेकरांना क्रिकेटचे भीष्माचार्य … Read more

गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अग्रवाल याचं निधन

अग्रवाल

वसमत | गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अग्रवाल याचं आज वसमत जि. परभणी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत या गावी १९२३ मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली. तेव्हाच त्यांचे नाते … Read more