मुंडे साहेब अमर रहे, अजित दादा तुम आगे बढो!राज्यभरात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शपथ ग्रहण केलीये. दरम्यान राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु असताना बीडमध्ये देखील पंकजा मुंडे यांच्या पराभवाने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये आशेचा किरण दिसून आलाय. पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली असल्याने आणि या सत्तेत धनंजय मुंढेंचाही समावेश असणार असल्याने कार्यटकर्ते अधिकच खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.

या ६ कार्यकर्त्यांनी हिरावला भाजप-सेना युतीचा महाजनादेश

विशेष प्रतिनिधी । साधारणतः लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी सेना-भाजपच्या वाटेवर जायला सुरुवात केली होती. आर्थिक घोळ केलेल्या नेत्यांना आपापल्या संस्था आणि जागा वाचवण्यासाठी हे पक्षांतर करावं लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये प्रामुख्याने गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल, मधुकर पिचड, वैभव पिचड, उदयनराजे भोसले, दिलीप सोपल, शेखर गोरे, गोपीचंद पडळकर, … Read more

धनंजय मुंडे परळीचा ‘गड’ राखण्याची चिन्ह; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष!!

परळीतील धनंजय विरुद्ध पंकजा लढतीवर सर्व राज्याचे लक्ष लागलेले असताना धनंजय यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेतली आहे. याच आघाडीतून धनंजय मुंडे समर्थक विजयापूर्वीच जल्लोष करत आहेत. धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत १८ हजार मतदान घेत पंकजा पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत कार्यकर्ते विजय साजरा करत आहेत.

धनंजय मुंडेंनी ‘हटके ट्वीट’ करत दिल्या मोदींना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींचे हटके स्वरुपात स्वागत करणारे ट्विट केले आहे. धनंजय मुंडे ट्वीटमध्ये म्हणतात, “मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, पण एकच इच्छा आहे. परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!”

धनाभाऊंचे पंकजा ताईंना ओपन चॅलेंज, ‘ट्रम्प जरी आणले तरी माझा विजय निश्चित’

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. तर दुसरीकडे १८ तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.

…तो पर्यंत फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेनी बांधली खूणगाठ

‘जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही. तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही’, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली

टी.पी मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का

काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी. पी मुंडेनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनंजय मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे

संग्राम भाव-बहिणीचा, परळी विधानसभा मतदार संघाचा !!

प्रतिनिधी उस्मानाबाद। परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संग्रामाचे मैदान. मतदारसंघांत गेल्या ८ निवडणुकांमध्ये सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. म्हणून या मतदारसंघाला भाजपाचा गड असे म्हंटले जाते. हा मतदार संघ पूर्वी रेणापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे ५ वेळा … Read more

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

राज्यातल्या जनतेनं या सरकारचं काय घोडं मारलंय? – मुंडे

पुणे प्रतिनिधी। विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष केलं आहे. धनंजय मुंढे यांनी पुण्यात पावसामुळे तयार झालेल्या भीषण परिस्थितीबाबत आपल्या ट्विटर हँडल वरून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ट्विट नुकतेच केलं आहे. ‘पुणे आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झालीय. ११ लोकांचा मृत्यू झालाय … Read more