निवडणुकीचा निकाल NDAच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं; तेजस्वी यादव ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीचे निकाल एनडीच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं आहे,” असं तेजस्वी यादव म्हणाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील पक्षांसोबत बैठक घेतली. बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव लवकरच ‘धन्यवाद यात्रा’ काढणार आहेत. तेजस्वी यादव यांनी … Read more

बिहारमध्ये NDA-महागठबंधनमध्ये ‘कांटे कि टक्कर’; निकालाला होणार विलंब; ‘ही’ आहेत कारणे

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालाला काहीसा उशीर लागण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आखून देण्यात आलेल्या नियमावलीमुळे बिहार … Read more

कोरोना काळात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली केली जारी

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येनं कोरोनाबाधित आढळत आहेत. दरम्यान, काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. साहजिकच निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू आहे.त्यानुसार, कोरोना काळात निवडणूक कशी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जारी केल्या आहेत. गाइडलाइन्सनुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक … Read more

ओक्लाहोमा येथून पुन्हा एकदा निवडणुक रॅली सुरु करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओक्लाहोमा या राज्यातून आपली निवडणूक प्रचार रॅली पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर ते टेक्सास, फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांत आपला मोर्चा वळवतील. कोरोना या जागतिक साथीच्या विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी आपल्या निवडणूक सभा तहकूब केल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प … Read more

महाराष्ट्राची पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच ‘हा’ निर्णय झाला- संजय राऊत

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली असून आयोगाच्या या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राची … Read more

आता क्वारंटाइन असलेल्यांच्या बोटाला लागणार शाई, निवडणुक आयोगाची संमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभर सुरू आहे. यामुळे, आज निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाचा आढावा घेतला असून आरोग्य अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींच्या बोटाला मतदानादरम्यान वापरण्यात येणारी शाई लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूमध्ये आज कोरोना विषाणूची ५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील चार इंडोनेशियन नागरिक आणि त्यांचा चेन्नई येथील गाईड यांची सलेम … Read more

करोनामुळं राज्यसभेची निवडणूक स्थगित; येत्या २६ मार्चला होणार होती निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. येत्या २६ मार्चला राज्यसभेच्या ५५ जागांवर निवडणुक होणार होती. करोनाच्या वाढत्या संसर्ग टाळण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून अद्याप या निवडणुकांची नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती पाहूनच तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात … Read more

निवडणुकीत मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ

बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष विजयी उमेदवार रवी राणा यांनी निवडणूक आयोगाव्दारे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला आहे.तसा अहवाल भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक निरीक्षकांनी पाठविला असल्यामुळे रवि राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात पदवीधरांनी नोंदणी करावी – प्रा. डॉ. बापू चंदनशिवे

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जुलै २०२० मध्ये होत असून पदवीधर व शिक्षक नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने दिलेली पहिल्या टप्प्यातील मुदत दि. ६ नोव्हेंबर रोजी संपली. यामध्ये शिक्षक मतदारसंघासाठी ५३,६४१ मतदारांची नोंदणी झाली असून सर्वाधिक यामध्ये पुणे १८७१४, सोलापूर १०९३९, कोल्हापूर १०७१४, सातारा ६९४१ तर सांगली जिल्ह्यात ६३२३ इतकी नाव नोंदणी झाली आहे. पदवीधर मतदार संघामध्ये पुणे ५९४१९, सोलापूर ३७७५१, कोल्हापूर ७५८२३, सातारा ५७४७३ तर सांगली जिल्ह्यात ७३७८८ इतकी नोंदणी झाली आहे. परंतु अजूनही अनेक पदवीधर व शिक्षक नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी समता फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी पत्राद्वारे सातारा व सोलापूर येथील निवडणूक अधिकाऱ्यांना मुदतवाढीसाठी आवाहन केले होते.

साताऱ्यातील ईव्हीएम घोटाळ्याची तक्रारच बोगस; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खुलासा

४५ सातारा लोकसभेसाठी आणि २५७ कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावेळी कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. दीपक रघुनाथ पवार या व्यक्तीने ही तक्रार दिली होती. मात्र सदर व्यक्तीला याच तक्रारीसाठी लेखी जोडपत्र क्रमांक १५ भरून देण्यास सांगितलं असता या उमेदवाराने टाळाटाळ केली. माध्यमातून ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जिल्हा व केंद्र निवडणूक प्रमुखांनी या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन याचा खुलासा केला.