भाजपतर्फे विधान परिषदेत पोटनिवडणुकीसाठी संजय केणेकरांचे नाव निश्चित

kenekar

औरंगाबाद – भारतीय जनता पार्टी तर्फे विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी औरंगाबादचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच औरंगाबादमधील डॉ. भागवत कराड यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी स्थान दिले आहे. यातच आता विधान परिषदेसाठी संजय केनेकर यांनी उमेदवारी निश्चित करण्यात आल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद वर भाजपचे विशेष लक्ष असल्याचे दिसत … Read more

शहरातील एका वॉर्डाची लोकसंख्या राहणार नऊ हजार

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेत 126 सदस्य राहणार असल्याने एका वॉर्डात सुमारे नऊ हजार 746 लोकसंख्या राहणार आहे. जुन्या रचनेत ही लोकसंख्या 12 … Read more

उदयनराजेंनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; जिल्हा बँक निवडणूकीमुळे राजकीय घडामोडींना वेग

कराड : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर फलटण टु कराड असा दौरा केला. या दौऱ्यात सकाळी फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर तर सायंकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली . छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत तर सभापती रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेसचे बडे … Read more

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध; नोव्हेंबर अखेरपर्यंत जाहीर होणार आरक्षण सोडत

औरंगाबाद – येत्या फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ दोन महिन्यांत समाप्त होत आहे. फेब्रुवारीतील या निवडणुकांची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विविध गटांतील आरक्षणाची सोडत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद जिल्हा … Read more

जिल्हा बँकेत जागावाटप निश्चित : राष्ट्रवादी 11, काँग्रेस 8 तर शिवसेनेला 2 जागा

सांगली | जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या असताना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनेलद्वारे निवडणूक लढविण्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस 11, काँग्रेस 8 आणि शिवसेनेला 2 जागा देेण्याचा फॉर्म्युला ठरविला आहे. मात्र शिवसेना चार जागांवर ठाम अडून राहिली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून निर्णय घेऊ, असे पालकमंत्री जयंत पाटील … Read more

शरद पवार साताऱ्यात : निमित्त मेळावा… लक्ष्य सातारा जिल्हा बॅंक

DCC bank Shrad pawar

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना चार्ज करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार येत्या रविवारी (ता.31) साताऱ्यात येत आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा हे निमित्त असणार असून लक्ष्य सातारा जिल्हा बॅंक असणार आहे. या मेळाव्याचे निमित्ताने शरद पवार हे राष्ट्रवादीच्या ताब्यात सातारा जिल्हा बॅंक कशी ठेवता येईल हेच लक्ष्य असणार आहे. … Read more

छ. उदयनराजेचं ठरलं : जिल्हा बॅंकेत गृहनिर्माणमधूनच निवडणूक लढविणार

सातारा | जिल्हा बॅंक सहकारातील अग्रगण्य असल्याचे सांगायला अभिमान वाटतो. बॅंकेच्या माध्यमातून हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या इच्छेनुसार याच मतदारसंघातून मी निवडणूक लढण्याचे निश्‍चित केले आहे. त्यास भरभरुन आशीर्वाद दयावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. सातारा जिल्हा बॅंकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास … Read more

सोसायटीत टशन की माघार : बाळासाहेब पाटील, जगदीश जगताप यांच्यातील चर्चेने वातावरण तापले

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक निवडणुकीने जिल्ह्यातील वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोसायटी मतदार संघातून अॅंड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व भाजपचे अतुल भोसले यांचे विश्वासू जगदीश जगताप यांच्या फार्म हाऊसवर राष्ट्रवादीचे नेते, जिल्ह्याचे … Read more

नवीन प्रभाग रचनांमुळे बदलणार सीमा

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले असून, लोकसंख्या व मतदार संख्या विचारात घेऊन वॉर्डांची चतु:सीमा ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे जुन्या वॉर्डांच्या सीमांमध्ये 10 टक्के बदल अपेक्षित असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार असून, प्रभाग रचनेचा … Read more

प्रत्येक प्रभागात एक वार्ड असेल महिलांसाठी राखीव

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मनपा मध्ये आता प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा क्षेत्रात 37 प्रभाग तीन वॉर्डांचे तर एक प्रभाग 4 बोर्डाचा होणार आहे. एकूण 38 प्रभागातील एक वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद महापालिकेची मुदत 29 एप्रिल 2020 रोजी संपली … Read more