देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?? प्रतिज्ञापत्रात सापडली ‘ही’ गंभीर चूक 

निवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

परभणीत जिल्ह्यात नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ऑक्टोबर महिन्यांमधील 21 तारखेला संपूर्ण राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. पण मागील पंचवार्षिक मध्ये गावागावात जाऊन पाच वर्षात गाव व तालुक्‍याचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचे आश्वासन नेतेमंडळींनी दिले होते. सदरील आश्वासने हवेतच विरले गेल्याने , पाच वर्षानंतर विकासापासून दूर राहिल्याची भावना निर्माण झाल्याने जिल्ह्यातील … Read more

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबरच

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली आता गतीमान होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणेच २७ सप्टे़बरला लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २१ आँक्टोबरला मतदान व २४ आँक्टोबरला मतमोजणी होईल. या निर्णयामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाला … Read more

सांगलीतल्या चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क : संजय विभूते

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली-मिरज विधानसभेसह जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असणार आहे.अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतची मागणी करणार असल्याची माहिती विभूते यांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तयारी सुरू झाली आहे. राज्यात भाजप-सेनेची युती आहे. जागावाटपाचा फार्मूला जवळपास निश्चित असलं तरी … Read more

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात होत आहे नव्या उमेदवाराची मागणी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्यात भाजपने विधानसभेला नवा चेहरा द्यावा, असे भाजपच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार बदलावा अन्यथा पक्षाला अडचण येऊ शकते, असे मत भाजपचे नेते डॉ.रवींद्र आरळी यांनी व्यक्त केले. शिवाय विधानसभेसाठी भाजपकडून माझ्यासह आठ जण इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, खासदार संजय पटील यांच्यासाठी … Read more

तासगाव विधानसभेला ‘या’ नेत्याला निवडून देण्याचे खा. संजय पाटील यांनी केले आवाहन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   लोकसभेच्या निवडणुकीत जाती पातीच्या विषारी प्रयोगाला थारा न देता जनतेने मला निवडून दिले आहे. आता अजितराव घोरपडे यांना विधानसभेला निवडून देण्याचे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ भाजपाच्यावतीने आयोजित केलेल्या कवठेमहांकाळ येथील नागरी सत्कार समारंभ प्रसंगी खासदार पाटील बोलत होते. प्रारंभी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे … Read more

राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता विधानसभेची चाहूल लागली आहे. पुढील चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय हालचालीही त्यादृष्टीने सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला यश मिळाले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडला. जिल्ह्यातही वंचित आघाडी पाय पसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याशी … Read more

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, संजय जाधव यांचा विजय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मागील तीस वर्षा पासुनची विजयाची वाटचाल कायम ठेवत शिवसेनेने परभणीचा गड राखलाय. संजय जाधव सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडूण आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा पराभव केलाय. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शिवसेनेने आघाडी घेतली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकरांनी शिवसेनेला काट्याची लढत दिली. मागील लोकसभा निवडणुकीत एक लाख … Read more

मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून परतताना कर्मचार्‍याचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून परतताना लिपीकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कृष्णा भरत सोनवणे, असे संबंधित लिपीकाचे नाव आहे. त्र्यंबकेश्वरहून परतताना नाशिक बस स्थानकावरच त्यांना काळाने गाठले. कृष्णा भरत सोनवणे हे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्लिश शाळेवर कर्तव्य बदावत होते. कर्तव्य बजावल्यानंतर सोमवारी सायंकाळी ते घरी परत … Read more

निवडणुक कामाचा भत्ता मागणार्‍या शिक्षकाला पोलिसांची धक्काबुक्की

कोल्हापूर प्रतिनिधी | निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडलीय. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही केवळ तीनशे रुपये भत्ता देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एका शिक्षकाला पोलिस अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. येथील शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. गडहिंग्लज … Read more