एकेकाळी दिवसाला मिळत होती 35 रुपये मजुरी, त्यानंतर भारताला जिंकवून दिला २०११ चा वर्ल्ड कप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |गुजरात मधील इखार या अज्ञात खेड्यातून येऊन कोणी 28 वर्षानंतर २०११ च्या विश्वकरंडक जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असे कुणाला स्वप्नातही वाटणार नाही.पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे भारतचा जलदगती गोलंदाज मुनाफ पटेल याची. दररोज मजुरी करणारा एक मजूर ते भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज होण्याचा त्याचा हा प्रवास एखाद्या सुंदर स्वप्नातून … Read more

इंग्लंड-विंडीज कसोटी सामन्यात खेळाडूंनी मैदानावर गुडघे टेकून केला वर्णद्वेषाचा निषेध

साऊथॅम्प्टन । कोरोना काळात क्रिकेट विश्व गेले काही महिने ठप्प होते मात्र , आता इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. साऊथॅम्प्टनमध्ये हा कसोटी सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे खेळाडू तसेच अम्पायर्स यांनी गुडघे जमिनीला टेकले. या सर्वांनी मैदानावर वर्णभेदाच्या विरोधात ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीचे समर्थन केले. अमेरिकेत … Read more

वरुन धवनने सौरव गांगुलीचा ‘हा’ फोटो शेयर करुन दिल्या शुभेच्छा; म्हणाला तो क्षण यादगार

मुंबई | माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. त्याचे चाहते आणि मित्र सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. केवळ क्रिकेटपटूच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या खास दिवशी सौरवला शुभेच्छा देत आहेत. अभिनेता वरुन धवल यांनेही सौरव गांगुलीचा एक मेमोरेबल फोटो शेयर करुन दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

ब्रिटनमध्ये येत्या एका वर्षात 22 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यू इकॉनॉमिक्स फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत, यूकेमध्ये तब्ब्ल 22 लाख लोक हे बेरोजगार होऊ शकतात. एनईएफ तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर सरकारने रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले नाही तर येथे लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होऊ शकतात. एनईएफने नेग्रिन प्रकल्पात 28 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. एनईएफच्या मते, या … Read more

जगासोबत संघर्ष करताना आपल्याच देशातील मुस्लिम लोकसंख्येवर अत्याचार करतो आहे चीन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन सध्या विविध कारणांनी सर्व जगभर चर्चेत आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असणारा देश, भारत चीन सीमेवरील तणाव, जगावर राज्य करू पाहणारा चीन अशा विविध नावांनी सध्या चीन जगभर गाजतो आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या बडया राष्ट्रांबरोबर चीन संघर्ष करतोच आहे. पण आपल्याच देशातील मुस्लिमांवर देखील अत्याचार करतो आहे. उइगर मुस्लिम आणि अन्य … Read more

‘कर्णधार झाल्यानंतरही खेळण्याची पद्धत मी बदलणार नाही’- बेन स्टोक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार जो रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे कर्णधारपद मिळवले असले तरीही आपली खेळण्याची पद्धत बदलणार नाही, असे स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स याने सांगितले आहे. आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्मामुळे 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत रूट खेळणार नाही आहे, त्याच्या जागी आता स्टोक्स कर्णधारपद सांभाळू शकेल. स्टोक्सने … Read more

चीनी संसदेत मंजूर झाला हॉंगकॉंगवर ताबा मिळविणारा कायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या संसदेत खास हॉंगकाँगसाठी बनविण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंगळवारी मंजूर करण्यात आला आहे. आता चीनला संपूर्ण हॉंगकॉंगवर ताबा मिळविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग २३ वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले होते. ते जरी चीनच्या ताब्यात असले तरी तिथे कायदे वेगळे होते. त्यामुळे चीनला तिथे त्यांच्या पद्धतीने कारभार करता … Read more

कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे काही नवीन रेकॉर्ड समोर आले आहेत. यातील पहिले रेकॉर्ड म्हणजे जगभरात या विषाणूला बळी पडून मरणाऱ्यांची संख्या ५ लाख पार करून केली आहे तर दुसरे रेकॉर्ड म्हणजे जगभरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता १ कोटी पार करून गेली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे … Read more

जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीचे संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात या विषाणूने ५,०२,५१७ लोकांचा बळी घेतला आहे. आणि एकूण रुग्णसंख्यादेखील वाढली असून ती १०,१७३,७२२ इतकी झाली आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी ४० हजारपेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत आढळून … Read more