Wednesday, March 29, 2023

जगासोबत संघर्ष करताना आपल्याच देशातील मुस्लिम लोकसंख्येवर अत्याचार करतो आहे चीन 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन सध्या विविध कारणांनी सर्व जगभर चर्चेत आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असणारा देश, भारत चीन सीमेवरील तणाव, जगावर राज्य करू पाहणारा चीन अशा विविध नावांनी सध्या चीन जगभर गाजतो आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या बडया राष्ट्रांबरोबर चीन संघर्ष करतोच आहे. पण आपल्याच देशातील मुस्लिमांवर देखील अत्याचार करतो आहे. उइगर मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांकांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनने अक्षरशः अघोरी उपायोजना केल्या आहेत.

एकीकडे उइगर मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन अघोरी उपायोजना करतो आहे तर दुसरीकडे देशातील हान बहुसंख्यांकची लोकसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन देतो आहे. चीनची ही दुटप्पी भूमिका आता देशातही दिसू लागली आहे. शिनजियांग प्रांतामध्ये मागच्या चार वर्षांपासून चीनकडून पद्धतशीरपणे ही प्रक्रिया सुरु असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. कागदपत्रांची तपासणी तसेच तिथल्या डिटेंशन सेंटरमधल्या नागरिकांशी बोलून हे वृत्त देण्यात आले आहे. सरकारी आकडे, राज्याची कागदपत्रे आणि डिटेंशन सेंटरममध्ये राहिलेल्या ३० जणांबरोबर बोलल्यानंतर ही गोष्ट समोर आल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

चीनमध्ये सरकारी यंत्रणाच तिथल्या अल्पसंख्यांक महिलांच्या गर्भधारणेवर लक्ष ठेवते. सरकारकडून हजारो नागरिकांची नसबंदी केली जाते महिलांना जबरदस्ती गर्भपात करण्यास भाग पाडले जाते अशी माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात नसबंदी कमी झाली असली तरी शिनजियांगमध्ये हे प्रमाण जास्त आहे. जास्त मुले असणं हे चीनमध्ये नागरिकांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्याचे एक कारण आहे. तीन किंवा चार मुले असणाऱे पालक दंडाची मोठी रक्कम भरत नाहीत, तो पर्यंत त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये डांबले जाते. मुलांना लपवून तर ठेवले नाही ना? हे तपासण्यासाठी घरावर छापे मारले जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.