स्वाभिमानीच्या रेट्यापुढे खा. संजयकाका पाटील नमले, शेतकऱ्यांना दिला एक कोटींचा धनादेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सलग आठ दिवस ठिय्या आंदोलन केल्यानंतर तासगाव आणि नागेवाडी कारखान्याचे एक कोटी रुपयांचे 29 जानेवारीचे धनादेश ख़ा. संजयकाका पाटील यांनी आंदोलक महिला शेतकर्‍यांना दिले. उर्वरित बिले 15 ही फेब्रुवारी पर्यंत सर्व शेतकर्‍याच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी पत्र ही यावेळी खासदारांनी आंदोलनस्थळी येवून दिले. यानंतर आठ दिवस सुरू … Read more

पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता मिळणार नाही

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. तुम्हालाही या योजनेचा … Read more

बाप म्हणाला, ‘पोरांनो आईची काळजी घ्या,‌ कर्जाचे पैसे देऊन येतो’; अन्…

औरंगाबाद – पोरांनो तुमच्या आईची काळजी घ्या, मी कर्ज घेतलेले पैसे जमा करून घरी योतच, असं सांगून घरातून निघालेला बाप दोन दिवस झाले तरी आला नाही. तिसऱ्या दिवशी विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याचे कळल्याने शेतकरी कुटुंबावर आभाळच कोसळलं. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथील ही घटना आहे. घरातील एकमेव कर्त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे निधनामुळे परिसरात … Read more

खासगी सावकारास अटक : शेतकऱ्यास 50 हजाराच्या बदली 16 लाखाची मागणी

Phaltan Police

फलटण | निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे 3 लाख 50 हजार घेऊनही 16 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केलेली असून न्यायालयात हजर केले … Read more

थकीत बिलासाठी संतप्त शेतकर्‍यांचा तासगावात रस्ता रोको, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली जोरदार झटापट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने थकविलेल्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तासगावात खासदारांच्या घरावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एकतर ऊसबिल द्या नाहीतर आम्ही सर्व शेतकरी तासगावातील चौकात सामुदायिक आत्महत्या करू, असा आक्रमक पवित्रा घेतला. घटनास्थळी खासदार संजयकाकांनी भेट देऊन 2 फेब्रुवारीपर्यंत … Read more

एफआरपी फरकाचे 16 कोटी शेतकर्‍यांना परत मिळणार, साखर सहसंचालकांचे जिल्ह्यातील कारखान्यांना आदेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गत हंगामात शासन नियमापेक्षा तोडणी वाहतुकीसह इतर खर्च ज्यादा लावल्याने ऊसाला द्यायच्या एफआरपीमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे कारखानदारांनी शेतकर्‍यांची कोट्यवधी रुपयांची लूट केली होती, याविरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवल्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 16 कोटी 17 लाख 44 हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 25 कोटी रुपये वाढीव एफआरपीची … Read more

‘त्या’ चारचाकी गाडीची सम्राट महाडिक यांच्याकडून पाहणी, महाडिक उद्योग समूहाकडून कुमार पाटील यांचा सन्मान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत शेतकर्‍यांसाठी उपयुक्त चारचाकी गाडीची निर्मिती करणार्‍या कुमार पाटील यांची भेट घेत युवा नेते सम्राट महाडिक यांनी कौतुक केले. सम्राट महाडिक यांनी कुमार पाटील यांच्या वर्कशॉपला प्रत्यक्ष भेट दिली आणि चारचाकी गाडीची पाहणी केली. इस्लामपूर पेठ रस्त्यावरील विष्णू नगर येथील फेब्रिकेशन व्यवसायिक कुमार पाटील यांनी एक वर्षाची मेहनत … Read more

कौतुकास्पद ! इस्लामपुरातील तरुणाने बनवली शेतीसाठीपूरक चारचाकी गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील … Read more

Budget 2022 : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार वाढवू शकते पीएम किसानची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात सरकारचा पूर्ण भर आगामी अर्थसंकल्प 2022 मध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर असू शकतो. यामध्येही विशेषतः ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेबाबत. याअंतर्गत सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक घोषणा करू शकते. यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”पीएम किसान अंतर्गत रक्कम 6,000 … Read more

100 एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी, अचानक लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळवा -बावची रस्त्यावरील ओढयालगतच्या शेतातील उसाला अचानक लागलेल्या आगीमुळे सुमारे १०० एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडूनलाखोरुपयांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले. ओढयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील मुख्यरस्त्यालगतच्या शेतातील विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्कीट होऊन खालील ऊसाने पेट घेतला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागात सर्वत्र ऊसशेती असल्याने गळीतास जाणाऱ्या ऊसाचे मोठे … Read more