धरणग्रस्त कुटूंबाला 5 वर्षांपासून अद्यापही मोबदला नाही; न्यायासाठी अमरण उपोषण

औरंगाबाद : दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. एका धारणग्रस्त कुटुंबाला त्याच्या शेतीचा मोबदला गेल्या 5 वर्षांपासून अद्यापही मिळाला मिळाला नाही. त्यांना न्याय मिळावा म्हणून त्या कुटुंबासह अमरण उपोषण सुरू करण्यात आली आहे. याबद्दल हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना, त्या कुटुंबाचे सदस्य विठ्ठल केंदाळे यांनी सांगितले कि, “कृष्णा खरोऱ्यात आमची … Read more

मागील वर्षीचा मृग बहार फळबाग विमा त्वरित जमा करा; दिनेश पाटेकर यांची जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी

औरंगाबाद : मागील वर्षी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबाग विमा भरलेला होता परंतु फळबाग विमा भरण्याची दुसरी तारीख जाहीर झाली तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात विमा परतावा मिळालेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना होणाऱ्या यातना निवेदनामार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे मांडल्या. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकरी … Read more

शेतीतील रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबातील तुंबळ हाणामारीत एकाची हत्या; एकजण जखमी

औरंगाबाद : शेतीच्या रस्त्याच्या वादावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री कचनेर जवळील घारदोन मध्ये घडली.या प्रकरणी दुपारपर्यंत चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. माणिक दादा नवपुते वय-65 (रा.घारदोन, कचनेरजवळ, ता.जि. औरंगाबाद) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या … Read more

शेततळ्याचे अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – दिनेश पाटेकर

dinesh patekar

औरंगाबाद | पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची मागील वर्षी पोकरा या योजनेतंर्गत शेततळे मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेततळे बनवली. मात्र अद्याप शेततळ्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नसल्याने संबंधित शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी पुढाकार घेत शेततळ्याचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावे अशी मागणी … Read more

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी ! केंद्र सरकार देत आहेत 4000 रुपये, तुम्हाला कसा फायदा होईल ते जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी येत आहे. केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रांसफर करेल. वास्तविक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळण्याची संधी आहे. यासाठी 30 जूनपूर्वी नोंदणी करावी लागेल. सरकारने नुकताच 2000 रुपयांचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रांसफर केला आहे. आता तुम्हालाही हे पैसे मिळवायचे असतील तर त्यासाठी त्वरित … Read more

Pm Kisan: केंद्र सरकार ‘या’ महिन्यात 4000 रुपये खात्यात ट्रांसफर करू शकेल, याचा फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । या महिन्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रांसफर करू शकते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळण्याची चांगली संधी आहे. सरकारने नुकताच 2000 रुपयांचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रांसफर केला आहे. आपल्यालाही हे पैसे मिळवायचे असल्यास त्वरित नोंदणी करा. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 कोटीहून अधिक शेतकर्‍यांची … Read more

आ. प्रशांत बंब यांनी थेट कासरा हातात धरत केली शेतीकामे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद | आमदार प्रशांत बंब यांचा शेतात काम करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या मान्सून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी आणि शेतीतील कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. प्रशांत बंब यांनादेखील शेतात गेल्यास शेतीकाम करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट नांगराचा कासरा हातात घेत वखरणी व नांगरणीला सुरुवात केली. माळी वडगाव … Read more

विजेचा तार कोसळून बाप लेकाचा मृत्यू

power line

उदगीर | विजेची तार तुटून अंगावर पडल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उदगीर तालुक्यातील बामणी शिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने दुचाकीवरून शेतातून घरी परत निघालेल्या बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास बामणी येथील शेतकरी नारायण यादवराव … Read more

शेकापचे अनोखे आंदोलन; कृषी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून केले बोंबा मारो आंदोलन

soyabean

बीड | सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले असल्याने, शेतकरीवर्ग बियाणे खरेदीसाठी लगबग करत आहे. मात्र कृषी केंद्र चालकाकडून बियाणांची कृत्रिम टंचाई करत, बियाणांची चढ्या भावाने विक्री केली जात आहे. त्यामुळे बीडच्या माजलगावमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. बुधवारी कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत शेतकरी कामगार पक्षाने अनोखे आंदोलन केले. कोरोनाच्या संकटात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांसमोर … Read more

कृषी दुकानदारांकडून केली जाणारी शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवा – पंकजा मुंडे

बीड | जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून, बी-बियाणे, खते वाढीव दराने विकली जात आहेत. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवण्यात यावी. अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्या दिलेल्या पत्रात म्हणाल्या, की सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणेची मागणी वाढत … Read more