गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी। भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस विभागाने वर्तविला आहे. पोलीस दलाचे सी-60 … Read more

‘ग्यारा पत्ती’ जंगलात नक्षलवादी , पोलिसांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यामधील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात आज पहाटे पोलिसांच्या ‘सी- ६०’ पथकातील जवानांशी नक्षलवाद्यांशी जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये पोलिसांना दोन नक्षलवादी ठार करण्यात यश आले. ‘सी- ६०’ पथकाचे जवान ग्यारा पत्ती जंगलात कालपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. दरम्यान, आज पहाटे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या … Read more

४०० मेंढ्यांसह ४ मेढपाळांना वाचवण्यात पोलिसांना यश, १०० हून अधिक गावे अद्याप संपर्कहीन

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. गोदावरी नदी ओसंडून वाहत असून तिच्या पात्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या चार मेंढपाळांसह पाचशे मेंढ्यांना सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात चार नागरिक … Read more

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड शहर पाण्याखाली

गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यात  गंभीर झाली असुन वीस मार्ग बंद पडुन तीनशे गावांचा संपर्क तुटलाय. भामरागडची पुर परिस्थिती गंभीर बनलीय. हॅलीकॅप्टरने आज जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडच्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारही बाजुने भामरागडला वेढले असुन तब्बल सहाशे नागरीकाना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवल आहे. भामरागडचा वीजपुरवठा मोबाईल सेवाही … Read more

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी

गडचिरोली प्रतिनिधी | काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने अहेरी उपविभागात लोकांची तारांबळ उडालेली आहे. उपविभागातील पाचही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाली असून अल्लापल्ली-सोरोंचा मुख्य मार्गावर पाणीच पाणी असल्याने रहदारी ठप्प झाली आहे. कमलापूर-छल्लेवाडा परिसरातील असंख्य गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहे. येथील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. रेपणपल्ली-कमलापूर रस्त्यावरील पूल पाण्याखाली … Read more

Breaking | पोलीसांसोबतच्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आज दुपारी पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला आहे. या सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया होऊ नये म्हणून सर्वत्र नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. असेच अभियान पोलिस व सी-६० … Read more

निर्माण – सामाजिक क्षेत्रात युवा नेतृत्व तयार करण्यासाठीचा एक प्रयोग

विशेष लेख । अमृत बंग महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने “निर्माण”हा उपक्रम जून २००६ मध्ये सुरू झाला…त्याविषयीआणि त्यातील तरुणाईविषयी…. सत्तर – ऎंशीच्या दशकात अनेक तरुण-तरुणींनी सामाजिक कार्यात उडी घेतलेली आपल्याला माहित आहे. त्यावेळचे वातावरण … Read more

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे शिक्षक भरती

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र आदिवासी विकास विभागातर्फे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे विविध पदांवरती शिक्षक भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण जागा – 23 जागा पदाचे नाव & तपशील- 1 उच्च माध्यमिक शिक्षक 06 2 माध्यमिक शिक्षक 07 3 पदवीधर प्राथमिक शिक्षक 02 4 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 04 5 केअर टेकर 04 शैक्षणिक … Read more

आल्लापल्ली जवळ तेंदुपत्त्याने भरलेला ट्रक जळून खाक

गडचिरोली प्रतिनिधी । तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदू पत्त्यासह ट्रक पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना आज दहा जून रोजी अल्लापल्ली – आष्टी मार्गावर आलापल्लीजवळ घडली. ट्रकमध्ये जवळपास 30 लाखांचा तेंदूपत्ता होता अशी माहिती आहे. सध्या जिल्ह्यातून तेंदूपत्त्यची वाहतूक केली जात आहे.आज अशाच एका ट्रकने वेलगुर येथून तेंदूपत्ता घेऊन जात असताना विज तारांचा … Read more