शहरी नक्सलवादाची चेटकीण आणि माध्यमांतील कथनं!  

Urban Naxalism

विचार तर कराल | प्रज्वला तट्टे विजय तेंडुलकरांचा एक दिवाळी अंकातील लेख आठवला. यात त्यांनी एका आदिवासी स्त्रीचा ‘चेटकीण’ म्हणून कसा अंत केला जातो ते लिहिलंय. सणाच्या वेळी नाचत असताना अचानक नाचण्याच्या रांगेतून काही आदिवासी बाहेर निघतात आणि एक स्त्रीचा पाठलाग करतात, तो प्रसंग जिवंत उभा केलाय. ते तिचा पाठलाग करतात, तिच्यावर दगडांचा वर्षाव करतात, … Read more

अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी दाम्पत्यास यंदाचा मेरी पाटील स्मृती पुरस्कार जाहीर

Lalsu Nogoti

मुंबई | गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांमधील आदिवासींचे अधिकार आणि शिक्षण याविषयी आनोखी कामगिरी करणारे अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी यांना मेरी पाटील स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा चौथा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयातील घैसास सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ नाटककार डॉ. राजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा … Read more

गडचिरोली मधील आंबटपल्ली गावात दारुबंदीसाठी प्रभातफेरी

muktipath

गडचिरोली | “दारू सोडा, आरोग्य जोडा”, “दारूची बाटली फुटली पाहिजे, गावाची दारू सुटली पाहिजे” या घोषणा देत आंबटपल्ली गावात दारूच्या निषेधार्थ प्रभातफेरी काढण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत दारू विक्रेत्यांनी एका दिवसापूर्वी उपलब्ध दारूची विल्हेवाट लावून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मुक्तीपथ’ या महाराष्ट्र शासन, सर्च संस्था आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभी राहिलेली … Read more

एक कोटीच बक्षिस असणारा जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण

naxalit

रायपूर (छत्तीसगड) | महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांचे एकत्रित एक कोटी बक्षीस असणारा नक्षलवादी छत्तीसगड पोलिसांना शरण आला आहे. पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. पहाड सिंग ची पत्नी छत्तीसगड मधील एका गावाची सरपंच होती. सरपंच असतांना २००३ साली पहाड सिंगच्या मित्रांनी च त्याच्या बायकोवर अविश्वास ठराव आणला आणि … Read more

नक्षलवादाचे आव्हान – देवेन्द्र गावंडे

Thumbnail

पुस्तक परिचय – प्रणव पाटील           खर तर मला नक्षलवाद रोमँटिक वाटायचा. कारण मी नक्षलवाद समजून घेण्याकरिता राहुल पंडीता यांचं हॅलो बस्तर हे पुस्तक वाचलं होते. त्यात खरं तर नक्षवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील माहीती दिलेली होती. ज्यात शिकलेले अनेक तरुण-तरुणी विशेषतः बंगालमधील झुंडीच्या झुंडीने नक्षलवादी बनून क्रांतीची स्वप्ने बघत होते पण … Read more

जागतिक मूळनिवासी दिनानिमित्त भामरागडमधे भरणार अधिकार सम्मेलन

Thumbnail

भामरागड | दरवर्षीप्रमाणे यंदा ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे “जागतिक मूळनिवासी दिवस” साजरा करण्यात येणार आहे. भामरागड़ पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने जागतिक मूळनिवासी दिवस समारोहाचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी मौजा बेजुर येथे आयोजण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि विशेषत: भामरागड तालुका आदिवासी बहुल म्हणुन सर्वांना परिचित आहे. या भागात माडिया-गोंड आदिवासींची सख्या … Read more

नक्षलवादी आता शरण येतील – सतीश माथूर

thumbnail 15245624766391

मुंबई : नक्सली विरोधी मोहिमेत सुरक्षा दलाने गडचिरोलीमध्ये ३७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीमधील बोरिया जंगल परिसारात झालेल्या चकमकीमधे महाराष्ट्र पोलिसांच्या सी ६० जवानांनी आणि सी.आर.पी.एफ ने ही कामगीरी केली आहे. रविवार आणि सोमवारी झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर लवकरच अनेक नक्सली शरण येण्याची अपेक्षा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केली आहे. … Read more