शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा ;  पडळकरांची रोहित पवारांवर जहरी टीका

padalkar and rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरून कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,” असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून … Read more

‘आधी तुम्ही आमचे रक्त प्यायलात, आता आम्ही तुम्हाला रक्ताचे दान देतोय, आतातरी धनगर आरक्षण द्या!’- गोपीचंद पडळकर

पंढरपूर । मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असताना धनगर समाजाचे फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदानाची मोहीम हाती घेतली आहे. ‘आजवर तुम्ही आमचे रक्त पित आलात आता आम्हीच आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी धनगर समाजाला आरक्षण द्या’, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला … Read more

….नाही तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार ; धनगर आरक्षण प्रकरणी पडळकरांचा सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता धनगर समाजाने आरक्षणासाठी  आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करुन आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी आज पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात येत आहे. ढोल वाजवून जर सरकारला जाग … Read more

आरेवाडीच्या बिरोबाला फसवलेले पडळकर आता विठ्ठलाला फसवायला आलेत: विक्रम ढोणे

पंढरपूर । दोन वर्षापुर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षणप्रश्नी खोट्या शपथा घेतलेले गोपीचंद पडळकर यांनी आता नव्याने फसवणुकीचा डाव मांडला आहे. विठ्ठलाच्या नावाने धनगर समाजाची फसवणूक करण्यासाठी ते पंढरपुरात आंदोलन करत आहेत. विठ्ठल मंदिरात ढोल बजाओ आंदोलन करणाऱ्या पडळकरांनी स्वत:च्या स्वार्थासाठी धनगर आरक्षणाचा ढोल कधीच फोडला आहे. त्यामुळे पडळकरांच्या भाजपप्रणित एजेंड्यापासून धनगर समाजाने सतर्क … Read more

सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत 

सांगली । आज गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती आहे.  महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक होत. लोकमान्य टिळक आणि गोपाळगणेश आगरकर हे एकेकाळचे चांगले स्नेही होते. त्यामुळे टिळक आगरकर हे महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. आज गोपाळ गणेश आगरकरांच्या जयंतीच्या दिवशी चर्चा होते आहे ती भाजपाच्या गोपीचंद पडळकरांची  त्याचे कारणही असेच आहे. गोपीचंद पडळकर यांनी गोपाळ गणेश आगकरांना … Read more

लोकं मला विचारुन टीका करत नाहीत; उदयनराजेंचं पडळकर-पवारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयन राजे भोसले यांनी बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी ज्यांनी कुणी कोणावर टीका केली ते त्यांचं त्यांना विचारा माझा काय संबंध? असे उत्तर दिले. माझा यात काय संबंध, मी माझे … Read more

‘पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील’; उदयनराजेंची तिरकस प्रतिक्रिया

सातारा । भाजप नेते गोपीचंद पडळकर मला विचारून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. उदयनराजे यांनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. यांनतर … Read more

गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक … Read more

अजित पवारांनी काढली गोपीचंद पडळकरांची लायकी; म्हणाले..

सातारा । भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना असल्याचे आक्षेपार्ह्य वक्तव्य पडळकर यांनी केलं होतं. त्यावर आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.लायकी नसलेल्या लोकांनी पवारांविषयी बोलणे … Read more