मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधी न्याय द्या; महाराष्ट्र बंद वरून भाजपची ठाकरे सरकारवर टीका

औरंगाबाद – महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, … Read more

आरोग्य विभागाचा गोंधळ ! एकाच युवकाचा अहवाल परभणीत पॉझिटिव्ह तर जालन्यात निगेटिव्ह

Corona Test

परभणी – जिल्ह्यातील मानवत येथील युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह तपासणी अहवाल प्रकारणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. परभणीच्या खासगी व जिल्हा शासकीय प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटिव आलेल्या तरुणाने या अहवालाला आव्हान देत जालना येथील शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, त्या ठिकाणी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे‌‌. घशातील लाळेचा किंवा नाकातील नमुना न घेता केवळ मोबाईल क्रमांक … Read more

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून उद्या मनसेचे ‘धरणे’

mns

औरंगाबाद – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे हतबल बळीराजाला तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मंगळवारी (दि.12) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे व सरचिटणीस संदीप नागरगोजे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राज्य सरकारने पंचनाम्यांचा फार्स न करता तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी तसेच प्रत्येक … Read more

अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

suicide

औरंगाबाद – अभ्यासाच्या तणावातून दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ते शनिवार रात्री दरम्यान घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निखिल लोळगे (16, रा. सिडको) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला. … Read more

शहरातील बजरंग चौकात थरार ! अवघ्या तीन सेकंदात तरुणाचा चाकूने भोसकून खून

Murder

औरंगाबाद – दारू पिण्या वरून झालेल्या वादातून अवघ्या तीन सेकंदात बजरंग चौकातील विश्वास वाईन शॉपी च्या काउंटर वरच एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना काल रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली खून केल्यानंतर आरोपी पळून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे असं हत्या झालेल्या … Read more

भाजपतर्फे मंगळवारी औरंगाबादेत ओबीसींचा विभागीय मेळावा

BJP Flag

औरंगाबाद – ओबीसी आरक्षणावरून चालढकलपणा करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातून ओबीसी आरक्षणात सरकार कसे अपयशी ठरले यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. मेळाव्यास माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, … Read more

विद्यापीठात ‘हंगामा’ ! परीक्षा संचालकांनी दिला तडकाफडकी राजीनामा

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शुक्रवारी अधिसभा बैठकीत सदस्यांनी एकापाठोपाठ एक आरोप करत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील कसे निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले. या आरोपामुळे हैराण झालेले डॉ. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. पाटील यांनी राजीनामा दिला असून तो स्वीकारल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. त्यामळे आता … Read more

डीफार्मसीच्या विद्यार्थ्याने केली सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी

Crime D

औरंगाबाद – पडेगाव परिसरातील अन्सार कॉलनी येथे घरफोडी करणाऱ्या विद्यार्थी असलेल्या चोरट्याला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक महिलेच्या मतिमंद नातूशी मैत्री करून घरात प्रवेश मिळवल्यानंतर सदर विद्यार्थ्याने हा चोरीचा गुन्हा केला. त्याच्या ताब्यातून एक लाख ८६ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. शेख आफताब शेख मुनीर (वय १९, रा.लोकसेवा दूध डेअरीमागे, अन्सार … Read more

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit pawar

औरंगाबाद – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याबाबत मदत म्हणून शासन पीक विमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, त्याचप्रमाणे या संकटात खचून गेलेल्यांना … Read more

औरंगाबादेत 47 केंद्रांवर उद्या यूपीएससीची परीक्षा, ‘हे’ आहेत नियम

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली अर्थात युपीएससी मार्फत उद्या 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात 47 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहे. युपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी उद्या औरंगाबादेतील केंद्रांवर 14 हजार 504 उमेदवार परीक्षा देतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ तथा परीक्षा समन्वयक निलेश गटने यांनी … Read more