‘तुझा गेम करून टाकीन’ असे म्हणत सुरक्षारक्षकाने केले अनैसर्गिक कृत्य

Crime

औरंगाबाद – उद्योगनगरी वाळूज परिसरात एका खासगी बँकेत काम करणाऱ्या शिपायास धाक दाखवून सुरक्षारक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना बजाजनगरात उघडकीस आली. याप्रकरणी सुरक्षारक्षकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगर परिसरातील कोटक महिंद्रा या बँकेत शहरातील संजय शिंदे (२४, नाव बदलले आहे) हा शिपाई म्हणून काम करतो. … Read more

हातात दांडा घेत महिलेने गाठले थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दालन !

औरंगाबाद – आमदार गावाबाहेर काढण्याची भाषा करतोय, पोलिसही माझी तक्रार घेत नाही, माझी जमीन नावावर करून घेत, मला भिकेला लावले.” असा आरोप करत एक महिला हातात दांडा घेऊन मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या दालनासमोर समोर उभी ठाकून न्याय मागत होती. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली … Read more

औरंगाबादकरांना 17 तास घेता येणार कर्णपुरा देवीचे ‘दर्शन’

karnpura

औरंगाबाद – नवरात्रीचा उत्सव आल्याने शहरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. कोरोनाच्या फैलावामुळे मागील दोन वर्षांपासून सर्व उत्सव घरातूनच साजरे करणाऱ्या औरंगाबादकरांना यंदा मात्र आपल्या लाडक्या श्रद्धापीठांना भेट देता येणार आहे. राज्य सरकारच्या आदेशांनुसार, शहरातील सर्व मंदिरे गुरुवारपासून खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वात प्राचीन समजले जाणारे कर्णपुरा देवीचे मंदिरदेखील भाविकांच्या आगमनासाठी सज्ज … Read more

शहरातील 17 ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीविरोधात सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन ! तलवारी, अवैध दारू जप्त

Aurangabad crime

औरंगाबाद – औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील 17 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संशयित आणि अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी 30 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत दारू विक्रेते, जुगारी शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात आले. आतापर्यंतचे शहरातील हे सर्वात मोठे कोम्बिंग ऑपरेशन ठरले. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक ठेवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनला चांगलेच … Read more

शेतीच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे थेट सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलन

samadhi

औरंगाबाद – औरंगाबाद तसेच परिसरात सप्टेंबर महिन्यात तीनदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालं आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आसमानी संकटानं सारं काही हिरावून नेलं. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. यातूनच औरंगाबादमधील एका शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मंगळवारी जलसमाधी आंदोलन केलं. अतिवृष्टीमुळे शेतीचे … Read more

शाळा सुरू परंतु महाविद्यालये अद्यापही बंदच ! पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

School will started

औरंगाबाद – कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षणाची मंदिरे शासनाने बंद करून ठेवली आहेत. पहिल्या लाटे नंतर काही दिवस ही मंदिरे उघडण्यात आली होती. परंतु, त्यानंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्याने पुन्हा ही मंदिरे लॉकडाउन करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने बारावी पर्यंतच्या शाळा चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. … Read more

जुन्या वादातून तिघांनी केला रिक्षाचालकाचा खून

Murder

औरंगाबाद – जुन्या भांडणाच्या वादातून एका पस्तीस वर्षीय ॲपेरिक्षा चालकाचा खून झाल्याची घटना घाणेगाव (ता.सोयगाव) येथे घडली आहे. मृत रिक्षाचालकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून घाणेगाव येथील तिघांविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय हरीचंद्र पिंपळे (वय 35 रा.घाणेगाव ता.सोयगाव) असे मयत ॲपेरिक्षा चालकाचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, संजय हरीचंद्र … Read more

शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

karad

औरंगाबाद – अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले आहे. शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली. ते काल अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कन्नड येथील भागाच्या पाहणी दौऱ्यावर गेले होते. यावेळी करडांना कुठे चिखल तुडवावा लागला … Read more

औरंगाबादचा ‘नमामि गंगा’ योजनेत समावेश

औरंगाबाद – गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र शासनाने ‘नमामि गंगा’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत गंगा नदीपात्राच्या आसपास असलेल्या शहरांचाच समावेश करण्यात आला होता. विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील दोन शहरांची सोमवारी निवड करण्यात आली. यामध्ये पुणे आणि औरंगाबादचा समावेश केल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. लवकरच ५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवुन देण्यास प्रयत्न करणार असल्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांचे नुकसान, जीवतहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. … Read more