शहराजवळ भीषण अपघात ! आई ठार तर मुलासह दोन चिमुकले गंभीर जखमी

accident

औरंगाबाद – चारचाकीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील वृद्ध महिला ठार, तर दुचाकी चालक व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. शेंद्रा एमआयडीसी मुख्य रस्त्यावरील हर्मन कंपनीसमोर रविवारी रात्री आठ वाजता हा गंभीर अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी सुमारे 60 फूट उंच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. … Read more

‘त्या’ प्रकरणात विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे अखेर निलंबित

bAMU

औरंगाबाद – शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. या माहितीस विद्यापीठाचे उपकुलसचिव (आस्थापना) गणेश मंझा यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबित होण्याची नामुष्की ओढवली आहे. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे याने रात्रीच्यावेळी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधल्याची तक्रार एका विद्यार्थिनी बेगमपुरा … Read more

औरंगाबादेत मध्यरात्री ‘द बर्निंग बस’ चा थरार !

fire

औरंगाबाद – शहराजवळच असलेल्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पार्किन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खासगी बसला शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आग लागली. ही घटना सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते जय भवानी नगर रस्त्यावर घडली यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबून कामगारांना बसमधून उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटातच … Read more

जायकवाडी धरण पूर्ण भरण्याच्या दिशेने मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे पाण्याची आवक घटली

jayakwadi damn

औरंगाबाद – नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली असल्याने जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र यात आता मोठी घट झाली आहे. त्यामुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. मात्र तरी देखील धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहचला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने गुरूवारी दुपार नंतर अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग जवळपास … Read more

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

cm

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार … Read more

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्रांकडून मराठवाड्याला ‘आठ’ मोठे गिफ्ट

cm

औरंगाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी योजनांचा पाढा वाचवून दाखवत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आज ज्याने ज्याने मला … Read more

संतापजनक ! ‘कपडे काढ, नाक घास’ म्हणत नर्सिंगच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये रॅगिंग

Crime D

नांदेड – जिल्ह्यातील बनचिंचोली (ता.हदगाव) येथील गोविंदराव पऊळ नर्सिंग महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून प्राध्यापकांसह तीन मुलीविरुद्ध रॅगिंग घेतल्याप्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमानवीय घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदराव पऊळ नर्सिंग महाविद्यालयात एका मुलीने आठ दिवसांपूर्वी प्रवेश घेतला होता. हाॅस्टेलमध्ये … Read more

नाशिक, नगर जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढली; जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात वाढ

Koyana Dam

औरंगाबाद – अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने काल सकाळपासून जायकवाडी धरणात 57 हजार 457 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे. 12 तासात धरणाचा जलसाठा 75 टक्के अशी भरघोस वाढ झाली असून, गेल्या 24 तासात नाशिक व नगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने धरण समूहातून … Read more

लॉकडाऊन काळात दुकाने उघडण्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी खासदार जलीलांसह 26 जणांविरुद्ध दोषारोपपत्र

Imtyaj jalil

औरंगाबाद – कोरोना महामारी विरुद्ध प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये बंद असलेली दुकाने उघडावीत यासाठी कामगार उपायुक्तांच्या सोबत हुज्जत घालणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 26 दुकानदार विरुद्ध दाखल गुन्ह्याचे 313 पानांचे दोषारोपपत्र तपास अधिकारी तथा क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. गणपत … Read more

संतपीठाचे अभ्यासक्रम तातडीने होणार सुरु, शैक्षणिक व्यवस्थापन बामू विद्यापीठाकडे

bAMU

औरंगाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच नऊ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय निर्गमित केला आहे. यामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे. पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, … Read more