धोकादायक बस चालविणारा ‘तो’ चालक निलंबित

unruly 'vehicles'

  औरंगाबाद – औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून धुळे कडे निघालेल्या एका बसचा चेसिसचा सेंट्रल बोल्ट तुटल्यामुळे बसची चाके एकीकडे आणि उर्वरित बसची बॉडी दुसरीकडे सरकली. याच अवस्थेत धोकायदायकरित्या वेगाने बस पळवत २९ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बसच्या चालकाला सध्या सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार प्रमुख शिंदे यांनी दिली आहे. याविषयी … Read more

बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हटवली म्हणुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला भाजप कार्यकर्त्यांना चोप

marhan

औरंगाबाद | औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत नुकत्याच झालेल्या उपसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच भाजप कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हटवल्याने राडा झाला. कॉंग्रेस सोडून भाजपत प्रवेश करत पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवणाऱ्या अर्जुन शेळके यांना त्यांच्या दालनात मारहाण झाल्याची घटना आज दुपारी घडली. कॉंग्रेसच्या दोन पंचायत समिती सदस्यांसह सात ते आठ कार्यकर्त्यांनी ही … Read more

प्रवासी मिळविण्यासाठी एसटी बस स्थानक सोडून ‘रस्त्यावर’ केली उभी

ST Bus

औरंगाबाद/ नवनीत तापडिया | मागील १७ ते १८ महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. मध्यंतरी काही दिवस यामध्ये शिथिलता दिली असली तरी, पुन्हा रुग्ण वाढत असल्याने निर्बंध घालून देण्यात आले होते. यादरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस देखील बस स्थानकात उभ्या होत्या. परंतु आता … Read more

करमाड रेल्वे स्थानकावर मराठवाडा एक्सप्रेस थांबवा; रेल्वे राज्यमंतत्र्यांकडे मागणी

Marathwada Express

औरंगाबाद । औरंगाबादहुन जवळच असलेले, व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रगतशील गाव म्हणून करमाड प्रसिद्ध आहे. याठिकाणी डीएमआयसी प्रकल्प उभा राहत आहे. त्यामुळे करमाड औरंगाबादकडे जाणारी मराठवाडा स्पेशल रेल्वे करमाड स्थानकावर थांबविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. करमाड येथे एमायडिसी हा … Read more

…तर राज्यात जाणाऱ्या हजारो बळीस राज्य सरकार जबाबदार असेल; विद्यार्थ्यांचा इशारा

MPSC

औरंगाबाद | राज्यात एमपीएससीच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. हजारो विद्यार्थी जागा कधी निघतील याची वाट पाहत आहेत. अभ्यास पूर्ण आहे घरच्यांकडून आता अपेक्षाही वाढलेल्या आहेत. मात्र परीक्षा होत नसल्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. राज्य सरकारने जर लवकरात लवकर रिक्त जागा भरण्याची घोषणा केली नाही तर राज्यात जाणारे हजारो … Read more

व्यापाऱ्यांना दिलासा नाहीच; निर्बंध तुर्तास जैसे थे

Unlock

औरंगाबाद | राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार अशी घोषणा २-३ दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्या २५ जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा देखील समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असला तरी जोपर्यंत शासनाचे लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.‌ शासनाच्या २५ … Read more

लोकअदालतीमध्ये पुन्हा जुळुन आले 25 संसार

Couple

औरंगाबाद । तिची मला समजून घेण्याची तयारी नाही, त्याला/तीला मोबाईलमधुन वेळच मिळत नाही. तो/तीच्या माहेरची/सासरची माणसे मिळुन माझा छळ करतात. तिच्या/त्याच्या जाचाला मी आता कंटाळले आहे. बायको/नवरा विरूद्धच्या अशा अनेक तक्रारी घेऊन कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्यांना तडजोडीचा एक आशेचा किरण म्हणजे कौटुंबिक न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालत होय. आज औरंगाबाद येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली … Read more

फ्रेंडशिप बॅंड द्या म्हणत दुकानात गेले अन् सोन्याची साखळी हिसकावून पसार झाले

Theif

औरंगाबाद| एका जनरल स्टोअरवर ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मागण्यासाठी दोन युवक आले होते. त्यानंतर १५ मिनिटांनी परत येत त्यांनी फ्रेंडशिप बेल्टची मागणी केली. हा फ्रेंडशिप बेल्ट देतानाच वृद्धेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची दीड तोळे वजन असलेली सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची फिल्मी स्टाईल घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अरिहंतनगरमध्ये घडली आहे. याविषयी अधिक माहिती … Read more

सहसचिवांची मनमानी! औरंगाबादचे परस्पर केले नामांतर

Muncipal Corrparation

औरंगाबाद | रोजगार हमी योजनेचे सहसचिव चि. नि. सूर्यवंशी यांनी चक्क औरंगाबादचे नावच बदलून टाकले आहे. २९ जुलै रोजी मराठवाड्यातील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कामांची यादी पाठविण्यासाठी दिलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सरकारी दस्तऐवजावर संभाजीनगर असा उल्लेख मुद्रित होऊन आल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये … Read more

उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक व टीमचा गौरव

  औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील वेरुळ गावाजवळील जय श्रीराम पेट्रोल पंपचे मॅनेजर अशोक काकडे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वेरुळ येथे पैसे भरण्यासाठी मोटार सायकल वर जात असताना वेरुळ उड्डाणपूला जवळ कोणी तरी मागून धक्का देऊन त्यांना खाली पाडले व यांचेवर भरदिवसा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या जवळील पाच लाख सदोतीस हजार रुपयाची बॅग हिसकावून घेऊन … Read more