लसीकरणात ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा तालुकाच मागासलेला

औरंगाबाद – ग्रामीण भाग लसीकरणात मागे पडल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी कंबर कसली असून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर लसीकरनात वाढ झाली आहे. असे असले तरी मात्र ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा तालुका अद्यापही लाल यादीत असून जिल्ह्यात सर्वात मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर त्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे … Read more

संपाचा फटका; एसटीचे सात कोटी रुपयांचे नुकसान

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला मोठा फटका बसत आहे. औरंगाबाद विभागाला दररोज पन्नास लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत तब्बल सहा ते सात कोटींपेक्षा अधिक फटका बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून संप सुरू केला आहे. सुरवातीला महामंडळाने प्राथमिक मागण्या मान्य केल्यामुळे एसटी कृती समितीने संप मागे … Read more

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा धारदार शस्त्राने खून

Murder

औरंगाबाद – उद्योग नगरी वाळूज महानगरात पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचा पतीने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना काल रात्री रांजणगाव परिसरातील दत्त नगरात घडली. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या शिवकन्या किरण खिल्लारे (23) हिचा पती किरण सोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादामुळे शिवकन्या काही दिवसांपासून आई जनाबाई … Read more

मनपाच्या विनंती नंतर व्यापाऱ्यांचा बंद स्थगित; हातगाडीवाले मात्र बंदवर ठाम

औरंगाबाद – शहरातील पैठण गेट व्यापारी असोसिएशन तर्फे दुकानात समोरील हातगाडी चालकांना हटवण्याच्या मागणीसाठी 22 तारखेला पुकारण्यात आले. बेमुदत बंद आंदोलन मनपाच्या विनंतीनंतर व्यापाऱ्यांनी स्थगित केले आहे. दुसरीकडे मात्र हात गाडी चालक व्यापार यांच्याविरोधातील बंद वर ठाम आहेत. बंद शिवाय मोर्चा ही काढण्याचा निर्धार आयटक आणि नॅशनल ऑफर्स फेडरेशनतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. पैठण गेट, … Read more

एमआयएममधून राष्ट्रवादीत आलेल्या नगरसेवकांची हकालपट्टी करा

NCP

औरंगाबाद – एमआयएम पक्षातील दोन माजी नगरसेवक कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांचा इतिहास माहीत असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. आता त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारणांमुळे पक्षाची खूप बदनामी होऊ लागली. त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शहराध्यक्ष विजय साळवे यांनी वरिष्ठ नेत्यांकडे एका पत्राद्वारे केल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद … Read more

मनपा निवडणुकीसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने थोपटले दंड; ‘इतक्या’ वॉर्डांत देणार उमेदवार

औरंगाबाद – महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी तशी राजकीय पक्षांमधील खलबतं मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशातच आता मनपा निवडणुकीसाठी प्रथमच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) ने दंड थोपटले आहेत. एसडीपीआय 20 ते 25 जागांवर उमेदवार देणार आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांसोबत कोणतीही आघाडी करणार नाही, असा निर्णय या पक्षाने … Read more

बीड बायपास रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था उत्तम करा; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

collector

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या बीड बायपास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केली. झाल्टा फाटा ते महानुभवान चौक या 14 कि.मी. रस्त्यादरम्यान होत असलेल्या रस्ते, पूल आदी कामांची प्रत्यक्ष पाहणी करत या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, रस्ता दुभाजक, ब्लिंकर्स, हायमास्ट आदींसह पोलिस, महसूल विभागाची चौकी तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.चव्हाण … Read more

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकाला दिलासा

Raina

औरंगाबाद – मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना विशेषतः हरभरा या पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काल सायंकाळी शहरातही पावसाचा शिडकावा झाला. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, माजलगाव … Read more

मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून ओवेसींचे सरकारला 5 सवाल

औरंगाबाद – एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील आघाडी सरकारला पाच सवाल केले आहेत. तसेच आरक्षणासाठी मुस्लिमांनी रस्त्यावरच उतरलं पाहिजे का ? असा सवालही असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला आहे. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. विषमता संपली पाहिजे. मुस्लिमांना शिक्षणात 4 टक्के … Read more

लाइटच्या डीपीसाठी फुलंब्रीतील शेतकरी आक्रमक, उपअभियंत्याला मारहाण

mseb

औरंगाबाद – काल गंगापूर येथील शेतकऱ्यांनी नादुरूस्त लाइटच्या डीपीवरून महावितरणच्या उप अभियंत्याला केबिनमध्ये कोंडल्याचा प्रकार ताजा असतानाच आज फुलंब्रीतील शेतकऱ्यांनीही याच कारणासाठी आंदोलन केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील डीपी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यात मोठी अडचण येत आहे. या कारणामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी गुरुवारी ही … Read more