मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी दिल्लीत होणार महत्वाची बैठक – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

danve

औरंगाबाद – देशातील बहुचर्चित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर लवकरच दिल्लीत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेयांनी ही माहिती दिली. या बैठकीत बुलेट ट्रेनबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्गालगतची जास्तीत जास्त जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून याव्यतिरिक्त 38 … Read more

जालना रोडवर रिक्षा पडली बंद, त्यातच झाली महिलेची प्रसूती

child death

औरंगाबाद – सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना होऊ लागलेल्या मातेला घेऊन जाणारी रिक्षा जालना रोडवर अचानक बंद पडली. रिक्षातच सदर महिलेला प्रसूती कळा आल्या आणि त्यातच तिची प्रसूती झाली. मात्र वाहतूक पोलिसांनी समय सूचकता दाखवत माता आणि बाळाला तत्काळ घाटी रुग्णालयात नेले आणि या दोघांचेही प्राण वाचवण्यात मदत केली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जालना … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप: 107 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

औरंगाबाद – एसटी महामंडळातील रोजंदारीवरील नव्या चालक तथा वाहक असलेल्या 107 कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे संपात सहभागी झाल्यावरून सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे दोन दिवासांत तेरा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू संपात सहभागी झालेल्या चालक तथा वाहकांनी 24 तासांच्या आत कर्तव्यावर हजर होण्याची सूचना नोटिसीद्वारे देण्यात आली आहे. रुजू न झाल्यास … Read more

डमी कोरोनारुग्ण प्रकरण – एक कोरोनाबाधित ताब्यात

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या मेल्ट्रोन कोवीड रुग्णालयात पॉझिटिव रुग्णांच्या जागी दोन कोरोना रुग्ण एजंट करवी भरती करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी समोर आला. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली असून, फरार असलेल्या दोन मूळ पॉझिटिव रुग्णांपैकी गौरव काथार या एका कोरोना रुग्णास सुरक्षितता बाळगत वेदांतनगर पोलिसांनी काल ताब्यात घेतले. सिद्धार्थ उद्यान येथे कोरोनाची ॲंटीजेन चाचणी केल्यानंतर … Read more

आरटीई प्रमाणपत्रासाठी लाच घेताना शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहाय्यक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या 25 टक्के विद्यार्थ्यांचा शुल्क परत मिळावा म्हणून इंग्रजी शाळेला प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्‍या वरिष्ठ सहाय्यक संपत नारायण गीतेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एका इंग्रजी शाळेने दोन वर्षांपूर्वी शुल्क परताव्यासाठी आवश्यक असलेले आरटीई 2 प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केले होते. शाळेचे लिपिक वारंवार चकरा मारत असताना गीते … Read more

उच्च शिक्षित महिलांचे पोटगी बंद करा – अतुल छाजेड

adv

औरंगाबाद – ज्या घटस्फोटीत महिलांचे महिन्याचे पगार 20 ते 25 हजार आहे अशा महिलांची कोर्टाने पोटगी बंद करावी अशी मागणी अतुल छाजेड यांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास औरंगाबादेतील उच्च नायालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. आज सुभेदारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना छाजेड म्हणाले, महिला खोट्या … Read more

सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयासमोरच चोरट्यांनी चार दुकाने फोडली

Crime

औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरांपैकी एक असलेल्या उस्मानपुरा भागातील दशमेश नगरात चोरट्यांनी थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच चार दुकाने फोडत पोलिसांना आव्हान दिले आहे. आज पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी भेट दिली. दशमेश नगर परिसरातील महादेव मंदिरासमोर उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय आहे. या … Read more

…अन्यथा 22 ला बाजारपेठ बंद; व्यापाऱ्यांचा मनपाला ईशारा

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी ते पैठणगेट या मार्गावर दोन्ही बाजूला फेरीवाल्यांच्या हातगाड्या लावण्यावरून व्यापारी आणि फेरीवाल्यांना मध्ये घमासान युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. फेरीवाल्यांच्या हातगाड्या हटवण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी 22 नोव्हेंबरला बाजार पेठ बंदची हाक दिली आहे, तर व्यापाऱ्यांच्या विरोधात 24 नोव्हेंबर रोजी फेरीवाल्यांनी बंद पुकारला आहे. हा प्रश्न आगामी काळात आणखी गंभीर … Read more

डॉ. कराडांच्या ‘त्या’ कृत्याचे मोदींनी केले कौतुक

karad

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे कौतुक केले आहे. विमान प्रवासादरम्यान रक्तदाब कमी झाल्यामुळे एक प्रवासी सीटवरुन खाली पडला होता. प्रोटोकाॅल बाजूला ठेवून कराड यांनी प्रवाशावर उपचार केले होते. त्या प्रवाशाचा जीव वाचवला. यामुळे मोदी यांनी कराड यांचे कौतुक केले आहे. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की माझे सहकारी डाॅ … Read more

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा उद्या होणार सादर

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाला कच्चा आराखडा सादर केला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक आगामी काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार राज्य शासनाने पावले उचलली आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग … Read more