रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी

Accident

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील कोसारी येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना त्यांचा दुर्देवी अपघात (Accident) झाला. या अपघातात तिघे जण ठार झाले आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजापुर गुहागर-राष्ट्रीय महामार्ग वरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली आहे. अजित … Read more

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाने घातले थैमान, गुड्डापूर मंदिर परिसरात साचले गुडघाभर पाणी

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातील दुष्काळी भागातही जोरदार पाऊस पडला आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर येथील मंदिरात पाऊसामुळे रस्ते पाण्याखाली गेले … Read more

धक्कादायक ! सांगलीत गळा दाबून महिलेचा खून

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील लकडे मळा या ठिकाणी उसाच्या शेतात वृध्द महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. वासंती श्रीकांत देशींगे-लकडे असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. मृत वासंती या नेहमीप्रमाणे पहाटे … Read more

दारुड्याचा पोलिस ठाण्यात दंगा; पेट्रोल अंगावर ओतून स्वतःलाच घेतले पेटवून

Women Fire

सांगली । मिरज शहर पोलिस स्टेशन आवारात मद्यधुंद अवस्थेत असलेला सर्फराज जमखंडीकर याने तिघांविरोधात तक्रार देण्यासाठी मिरज शहर पोलिस ठाण्यात आला. त्याची तक्रार घेतल्यानंतर तिघांना अटक लवकर करा असे म्हणून तो बाहेर जावून त्याने पेट्रोल अंगावर ओतून घेवून पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न करीत असतना पोलिसांनी तात्काळ पळत जावून त्याला लागलेली आग विझविली. त्याला लगेच शासकीय … Read more

उसने पैसे परत मागितल्याचा रागातून मित्राचा खून करणार्‍यास जन्मठेपेची शिक्षा

सांगली : जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत मित्राने दिलेले उसने पैसे परत मागितल्याचा रागातून खून केल्याची घटना घडली होती. या खूनप्रकरणी कर्नाटक राज्यातल्या कनमडी येथील आरोपी शिवानंद भीमाण्णा मुजनवार यास दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महादेव कोहळी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत महादेव कोहळी व … Read more