‘ICC’ने भारतीय संघाला ठोठावला दंड; हे आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. दरम्यान, या पराभवाबरोबरच भारतीय संघाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. … Read more

भारत आशिया चषकात न खेळल्यास, आम्ही 2021चा टी -20 वर्ल्ड कप खेळणार नाही: पीसीबी

भारत पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये आयोजित आशिया कपमध्ये बीसीसीआयने भारतीय संघ पाठविण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आज पीसीबीचे अध्यक्ष वसीम खान यांनी भारत या स्पर्धेत सहभागी न झाल्यास २०२१ मधील ट्वेंटी -२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी नकार देईल असं आयसीसीला कळवलं आहे.

हिटमॅन रोहित शर्मा ठरला यंदाचा आयसीसी ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इअर २०१९’चा मानकरी

आयसीसीकडून विशेष कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

‘क्रिकेट वर्ल्ड कप’ दर ३ वर्षांनी? बीसीसीआय-आयसीसी मध्ये वादाची ठिणगी!

आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी तर टी २० स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते. आता मात्र टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर ३ वर्षांनी आयोजित करण्याचा विचार आयसीसी करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत.

क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात ‘आयसीसी’ ने केला बदल

गेल्या जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला होता. पण इंग्लंडचा हा विजय वादग्रस्त ठरला होता तो आयसीसीच्या एका नियमामुळे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना जेव्हा टाय झाला तेव्हा सामना सुपर ओव्हरमध्ये केला. दोन्ही संघांनी सुपर ओव्हरमध्ये देखली समान धावा केल्या. पण इंग्लंड संघाने सर्वाधिक चौकर मारल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ केला होता. पण त्यांना आयसीसीच्या नियमामुळे विजेतेपद मिळाले नाही. अंतिम सामन्यातील या निकालावर आजी-माजी क्रिकेटपटूंसह सामन्या चाहत्यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली होती. आता या वादग्रस्त नियमात आयसीसीने बदल केला आहे.

आता दरवर्षी अनुभवा ‘टी-२० वर्ल्ड कप’ चा थरार !!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं एक मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलबरोबरच आता दरवर्षी टी-२० वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत आयसीसीनं अंतिम निर्णय घेतला नसला तरी, यावर विचारविनिमय सुरू आहे. आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या प्रस्तावात प्रत्येक वर्षी टी-२० वर्ल्ड कप तर, दर तीन वर्षांनी एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे.

म्हणून विराटकोहलीने मागितली स्मिथची माफी

विश्व चषक २०१९ | भारताने विश्व चषक सामन्यात चांगलीच सुरुवात केली असून भारत या वर्षीच्या विश्व चषकाचा प्रबळदावेदार मानला जातो आहे. दक्षिण आफ्रिकेला मात दिल्या नात्र काल भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघावर ३६ धावांनी विजय मिळवला. भारत आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारचाने नाणेफेक … Read more