शहीद जवानांच्या वीरपत्नींना ठाकरे सरकारकडून ‘हे’ गिफ्ट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहीद जवानांच्या वीरपत्नींना घरफळा माफ करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. सरकार शहीद जवानांच्या कुटूंबियांसमवेत कायम आहे. अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहीद जवानांच्या कामाचा आदर करत वीरपत्नींचा गौरव करण्याच्या उद्देशानव आम्ही हा निर्णय घेतला आहे. वीरपत्नींचा … Read more

करोनाने केला भारतीय सैन्यावर हमला; एक जवान करोना व्हायरस पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. देशभरात या व्हायरसने ३ जणांचा मृत्यू झाला असून बळी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान, भारतीय सैन्यातील एक जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. वृत्तसंस्था एएनआयने सैन्य स्रोतांच्या आधारे दिलेल्या वृत्तात सांगितले की, भारतीय सैन्यातील एका ३४ वर्षीय जवानाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. … Read more

व्हिडिओ: भारतीय सैन्याचा पाकिस्तानला ‘ईट का जवाब पत्थर से’; तोफगोळे डागून उद्धवस्त केल्या पाकिस्तानी चौक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याची आज भारतीय सैन्याने चांगलीच जिरवली. भारतीय सैन्याने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्धवस्त केल्या. या धडकी भरवणाऱ्या कारवाईचा व्हिडीओ भारतीय सैन्याने पोस्ट केला असून, यात पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या नेस्तनाबूत झाल्याचे दिसत आहे. #WATCH Indian Army Sources: Army … Read more

अभिमानस्पद! पुलवामामध्ये शहिद मेजरची वीरपत्नी सैन्यात सामील होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास एका वर्षापूर्वी, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शहीद पतीच्या पार्थिवा समोर झुकून त्याच्या वीरपत्नीने कानात ‘आय लव्ह यू’ असं म्हणतांना पहाताना प्रत्येकाचे डोळे भरून आले होते. ज्या वर्दीत तिच्या पतीने देशासाठी कुर्बानी दिली होती आता तीच वर्दी घालण्यास ही वीरपत्नी सज्ज झाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर … Read more

श्रीनगर महामार्गावरील चकमकीत ३ दहशतवादी ठार; चकमक अजूनही सुरु

जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत आतापर्यंत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. आज पहाटेपासून सुरू झालेली ही चकमक अजूनही सुरूच आहे.

खासदार संभाजीराजेंच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत, भारतीय सैन्याने केला विशेष सन्मान

भारतीय सेनेच्या दिल्ली मुख्यालयाकडून खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जनरल ऑफिसर कमांडिंग, कर्नल ऑफ दी रेजिमेंट(मराठा लाईट इंफंट्री) लेफ्ट.जन. मिस्त्री यांनी संभाजीराजे यांच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत हा सन्मान केला.

भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल – पंतप्रधान मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करतांना सांगितले की, आमच्या शेजार्‍यानं आमची तीन युद्धे गमावली आहेत. आणि पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी आपल्या सैन्याला फक्त १० दिवस लागतील. भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल. यानंतर पाकिस्तानने प्रॉक्सी वॉर सुरू केले. पंतप्रधान दिल्लीतील कैरप्पा मैदानावर एनसीसी कॅडेट्सच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पंतप्रधान … Read more

कौतुकास्पद..!! छत्तीसगडमधील जवानांनी गरोदर महिलेसाठी केली ६ किलोमीटरची पायपीट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बाळंतपणाच्या वेदना या कुणालाही सांगून समजणाऱ्या असतात. मातृत्व अनुभवणाऱ्या महिलेसाठी जगण्या-मरण्याचा हा प्रसंग परिक्षा पाहणारा असतो. छत्तीसगडमधील दुर्गम भागात अडकलेल्या महिलेला अशाच संकटातून बाहेर काढण्यात सीआरपीएफच्या जवानांनी मोलाचं योगदान बजावल्याची प्रेरणादायी घटना मंगळवारी समोर आली आहे. Chhattisgarh: A team of Central Reserve Police Force (CRPF) carried a pregnant woman on a … Read more

काश्मिर खोर्‍यात १० – १२ वर्षांच्या मुलांना कंट्टरपंथापासून रोखण्याकरता छावण्या – बिपिन रावत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | काश्मिरमध्ये १० – १२ वर्षांची मुले देखील कट्टरपंथीयांना बळी पडली आहेत. आणि या वयोगटातील मुलांना कंट्टरपंथीयांपासून रोखण्यासाठी आपण डिरेडिकलाईझेशन कॅम्प चालवत असल्याची माहिती भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांनी गुरुवारी दिली. दिल्ली येथे आयोजित ‘रायसीना संवाद’ या कार्यक्रमात बोलताना रावत यांनी यावर भाष्य केले. काश्मीरमध्ये १०-१२ वर्षाची मुले … Read more

काश्मीरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाला भारतीय जवानांनी शर्थीने वाचविले: पहा व्हिडिओ

टीम हॅलो महाराष्ट्र। जम्मू-काश्मीरमधील लाचीपुरा येथे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तारिक इक्बाल या नागरिकाला भारतीय लष्कराच्या जवानांनी शर्थीचे प्रयन्त करत वाचवले. बर्फाच्या ढिगाऱ्यातून काढल्यानंतर गंभीर अवस्थेत इकबालला उपचारातही हलविण्यात आलं होत. इक्बालची प्रकृती साध्य ठीक असून हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पहा व्हिडिओ-   #WATCH Jammu & Kashmir: Indian Army personnel rescue a civilian Tariq Iqbal … Read more