महाविकास आघाडीत काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर जितेंद्र आव्हाडांचे सूचक विधान; म्हणाले..

मुंबई । महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एक विधान केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते … Read more

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more

पंतप्रधान मोदीजी चीनवर सर्जिकल आघात करण्याची ‘ती’ वेळ; जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

मुंबई । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन यांच्या लष्करी चर्चा सुरु असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात अचानक हिंसक झडप घालण्यात आली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत २० जवान शहीद झाले आहेत. यावरुन देशभरातील नेते आक्रमक झालेयत. झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे ‘लाल आंखे’ करा असा सल्ला राज्याचे गृहनिर्माण … Read more

गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, ही घ्या आकडेवारी; आव्हाडांनी डागली भाजपवर तोफ

मुंबई । राज्यातील कोरोना मृत्यू दराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजपवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीकेची तोफ डागली आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील ‘कोविड १९’ मृत्युदराची टक्केवारीच आव्हाडांनी सादर करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला. आव्हाड यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील मृत्यूची टक्केवारीच ट्विटरवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले … Read more

‘एसआरए’च्या प्रत्येक प्रकल्पात प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

मुंबई । देशभरात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला आण त्यातही मुंबईला बसला आहे. मुंबईतल्या दाटीवाटीच्या वस्तीतल्या लोकसंख्येमुळेही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्येही कोरोनाने थैमान घातलं. यानंतर आता राज्य सरकारने एसआरए प्रकल्पांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून १ हजार ते ५ … Read more

MBBS पदवी धारकांना सुवर्णसंधी; ठाणे येथे तातडीची भरती – जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर … Read more

लोकल ट्रेन सुरु करा! जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारकडं मागणी

मुंबई । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारनं मुंबईतील लोकल गाड्या काही प्रमाणात सुरू कराव्यात, अशी मागणी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारला केली आहे. येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार … Read more

..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट … Read more

फडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या पुरावा

मुंबई । महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून स्यू मोटू … Read more

अर्थमंत्री सीतारामन यांचा ‘निर्मला अक्का’ असा उल्लेख करत आव्हाडांनी हाणला टोला, म्हणाले..

नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी मजुरांची भेट घेऊन विचारपूस केल्यावर त्यांना  ड्रामेबाज म्हणणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून टोला हाणला आहे. एखाद्याविषयी माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं ही ड्रामेबाजी असेल तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असा टोला आव्हाड … Read more