केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेशी घोष हीची भेट घेतली आणि म्हणाले की विद्यापीठातील फी वाढ आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. विजयन यांनी आयेशीची दिल्लीतल्या केरळ भवनामध्ये भेट घेतली, आयेशीची भेट घेऊन तिला सुधन्वा देशपांडे यांचे ‘हल्ला बोल: द डेथ अँड लाइफ ऑफ सफदर हाश्मी’ हे पुस्तक भेटवस्तू म्हणून दिली. विशेष म्हणजे, मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांच्या एका गटाने विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला, त्या दरम्यान आयेशीच्या डोक्याला जबर मार लागला होता. आयेशीला तिच्या आणि जखमी झालेल्या इतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता, विजयन म्हणाले, “न्यायाच्या लढाईत संपूर्ण देश जेएनयूएसयू सोबत आहे. तुमच्या आंदोलनाबद्दल सर्वांना माहिती आहे आणि तुम्हाला काय झाले आहे हे देखील सर्वांना माहीत आहे.” सीपीआयच्या ज्येष्ठ नेत्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की जेएनयूचे विद्यार्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात मोठी लढाई लढत आहेत. विजयन म्हणाले, “आयेशी घोष जखमी असूनदेखील लढाईचे नेतृत्व करत आहे.”