जेएनयू हल्ल्याची चौकशी करण्याची अमित शहा यांची मागणी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं आहे. चेहरे बांधलेल्या अवस्थेत गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे व्हिडियो व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

जेएनयू हिंसाचार म्हणजे शहा प्रेरित आंतकवाद – जितेंन्द्र आव्हाड

मुंबई | जेएनयू हिंसाचार म्हणजे शहा प्रेरित आतंकवाद आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ट्विटर वरुन जेएनयू हिंसाचाराचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारला याबाबत जाब विचारला आहे. रविवारी रात्री जेएनयू कॅम्पसमध्ये चेहरा झाकलेल्या गुंडांनी हिंसाचार करत प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांना मारहाण केली. सदर … Read more

आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात – राहुल गांधी

दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात असंच आजच्या जेएनयू वरील हल्ल्यावरुन दिसत आहे असे राहुल यांनी म्हटले आहे. मुखवटा घातलेल्या गुंडांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर पाशवी हल्ला केल्याने अनेक जण गंभीर जखमी … Read more

सावरकरांना भारतरत्न देणे हा भगतसिंगचा अपमान आहे – कन्हैय्या कुमार

नगर शहर मतदारसंघातील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारार्थ दिल्ली येथील जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि भाकपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कन्हैय्या कुमार यांची गुरुवारी नगरमध्ये सभा पार पडली. नगर शहर मतदारसंघातून भाकप कडून बहिरनाथ वाकळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता वाकळे यांच्या प्रचारार्थ कन्हैय्या कुमार यांची सभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी कन्हैया कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींनी केली होती ‘तिहार’ जेलवारी!

अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारीच जाहीर झाला. या पुरस्कारानंतर आता समोर येते आहे ती त्यांच्या तुरुंगवारीची चर्चा. अभिजित बॅनर्जी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे अर्थात जेएनयुचे विद्यार्थी होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांना १० दिवस तिहार तुरुंगात रहावे लागले होते. जेएनयूचे त्यावेळचे अध्यक्ष एन. आर. मोहांती यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले. मोहंती यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध म्हणून शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. या विद्यार्थ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांमध्ये अभिजित बॅनर्जी यांचाही सहभाग होता. त्यामुळे त्या काळात त्यांना १० दिवस तुरुंगात रहावे लागले होते.