धक्कादायक ! टवाळखोराचा मुख्याध्यापकावर तलवारीने प्राणघातक हल्ला

औरंगाबाद – मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ घडली. कन्नड शहरा जवळील साखर कारखान्यासमोर आसलेल्या कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयात ही खळबळजनक घटना आज घडली. या घडनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुजीब जमील शेख असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली … Read more

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील औराळा इथं माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते काल आमने सामने आले. त्यानंतर काही वेळासाठी औराळ्यातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. येथील आठवडी बाजारात देखील या धक्काबुक्कीचे पडसाद दिसून आले. औराळा इथं हर्षवर्धन जाधव यांची सभा सुरु होती. … Read more

झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृत बिबट्या

bibatya

औरंगाबाद – झाडांवर फांद्यांमध्ये लटकलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याचा प्रकार आज सकाळी कन्नड तालुक्यातील आमदाबाद शिवारात समोर आला आहे. शिकार करताना फांदी मध्ये अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी काही शेतकरी शेतात जात असताना झाडावर लटकलेल्या अवस्थेत बिबट्या शेतकऱ्यांना दिसून आला. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर … Read more

महावितरण विरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर

Kannad

औरंगाबाद – महावितरण विरोधात जिल्ह्यातील कन्नड शहरात आज शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून महावितरण तर्फे शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होती. आज महावितरणच्या या वसुलीविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने शेतऱ्यांकडून सक्तीने सुरू असलेल्या वीज बिल … Read more

औट्रम घाटात जड वाहनांची वाहतूक पुन्हा बंद

darad

औरंगाबाद – राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड- चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने अडीच महिन्यांपासून जड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्यात आला होता. कोट्यवधी रुपये खर्च करूनही काम अपूर्ण असताना आठ दिवसांपूर्वी घाटातून जड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, काम अपूर्ण असल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होत असून जड वाहनांची वाहतूक आता पुन्हा एकदा बंद करण्यात … Read more

सिल्लोडजवळ नादुरुस्त टिप्परला आयशरची धडक; दोन ठार

Accident

औरंगाबाद – सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा भीषण अपघात सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास झाला. अपघातात मरण पावलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माळसिरस येथील रहिवासी आहेत. पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना … Read more

शेतकऱ्यांनी चिंता करू नये; जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

abdul sattar

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. दरम्यान आज रविवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद … Read more

अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यात हाहाकार! जनजीवन विस्कळित तर अनेक गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद – कन्नड तालुक्यात मंगळवारी दिवसभर आणि रात्री पडलेल्या धुवाधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी आणखी वाढेल या धास्तीने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. तसेच तालुक्यातील आठही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कन्नड शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अतिवृष्टीमुळे शिवना नदी ला आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला … Read more

पावसाचा कहर ! दरड कोसळल्याने गौताळा घाटात वाहतूक विस्कळीत

darad

औरंगाबाद – प्रसिद्ध वन्य अभयारण्य असलेल्या गौताळा घाटात नागद ते कन्नड मार्गावर म्हसोबा हुडीजवळ पहिल्याच वळणावर दरड कोसळली आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी पहिल्या हुडीपासून ते दुसऱ्या वळणापर्यंत धोकादायक रस्ता झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठी दगडे वर अडकली आहेत. तसेच अनेक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर वनविभागाच्या कक्ष क्रमांक … Read more

बाधित भागातील ग्रामस्थांना तत्काळ सर्व सोयी सुविधा द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील सात मंडळांमध्ये मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या बाबी, सोयी सुविधा तत्काळ दुरुस्त कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी नवीन बाबींचा समावेश करावा. बाधित झालेल्या भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांना सोयी सुविधा तत्काळ द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या … Read more