वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ४
वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बसल्या जागी एका नवीन दुनियेतून सफर करून येतो हे फक्त मी ऐकलं होतं पण मृत्यूंजय कादंबरी वाचल्यानंतर मला याची प्रत्यक्ष अनुभूती आली. जिवंत महाभारत या कादंबरीमुळे मला बघायला मिळालं. कर्णाची ही शौर्यगाथा वाचताना कधी ओठांवर स्मितहास्य तर कधी गालांवरून घरंगळते दोन अश्रू….