लातूर भूकंपानंतर आम्ही जशी मदत केली तशी मदत हे सरकार पूरग्रस्तांना करणार का : शरद पवार

कराड प्रतिनिधी | अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेलीत. येथील लोकांची मोठी हानी झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत पुरवावी असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीकडून पुरग्रस्तांना जीवनावश्क वस्तुंचा पुरवठा करण्यात येत आहे. पुरामुळे वित्तहानी आणि भरून न निघणारी जीवीतहानी देखील झाली आहे. … Read more

कराड येथील जुना कृष्णापूल कोसळला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कऱ्हाड – विटा मार्गावरील ब्रिटिश कालीन जुना कृष्णा पूल आज कोसळला. या पुलावरून गुहागर ते पंढरपूर अशी वाहतूक होत होती. काही दिवसापूर्वी धोका जाणवत असल्यामुळे नागरिकांचा विरोध असतानासुध्दा या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. या पाण्याच्या … Read more

पेशवाई आणणार्‍यांच्या कुटील डावाला बळी पडू नका – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ‘देशात धर्माच्या ध्रुवीकरणातून जातीय तेढ निर्माण करणारी शक्ती मोठ्या गतीने कार्यरत झाली आहे. त्यांना पुन्हा पेशवाईकडे देशाला न्यायचे आहे. जनतेने आपला विकास आणि जातीय सलोखा राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तीबरोबर रहावे. पेशवाई आणू पाहणाऱया शक्तींना ओळखून त्यांचा हा कुटील डाव उधळून लावावा’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. … Read more

पावणेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा, सांगली जिल्ह्यात घरफोड्या, दरोडे टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. एकूण 85 घरफोड्या केल्याची कबुली अटकेतील संशियतांनी दिली असून त्यांच्याकडून 34 घरफोड्यातील 14 लाख रूपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. जावेद अनिल काळे … Read more

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण परिसर मंगळवारी रात्री भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या परिसरात आज (मंगळवार) रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. कोयना धरण परिसरात झालेल्या या भूकंपाच्या केंद्रबिंदू कोयनानगर पासू 12.8 किलोमीटर वर होता. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. … Read more

मलकापूर येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी मलकापूर येथील वारणा हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दा फाश केला आहे. यामध्ये दोन महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले असून एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार दि.30 जून रोजी सायंकाळी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत … Read more

कराड नगरपालिकेत भाजपा नगरसेवक आणि भाजपा नगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पालिकेच्या शासकीय घरकुलात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तसेच गोपनीय कागदपत्रे पालिकेतून बाहेर जातातच कशी या मुद्द्यांवर कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे आणि भाजपचे नगरसेवक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. कराड नगरपरिषदेची शनिवारी सायंकाळी मासिक सभा आयोजित केली होती. यावेळी सभागृहात नगरसेवकांनी गोंधळ घातला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावस्कर व भाजपा नगराध्यक्षा सौ … Read more

पृथ्वीराजबाबांची 700 मीटरची शिवारफेरी, शेतात केली कोळपणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, काँग्रेसचे महासचिव, राज्याचे माजी मुख्यमंत्री यासह अनेक जबाबदाऱ्या उत्कृष्ट आणि कौशल्याने यशस्वी पार केलेल्या कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शनिवारी) सकाळी मतदारसंघातील वांग खोऱ्यात विकासकामांच्या झंझावती दौऱ्यास सुरुवात केली. त्यांच्या विशेष प्रयत्नातून या खोऱ्यातील वानरवाडी येथील महत्वपूर्ण जुन्या पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे. … Read more

येरवळेतील आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचा भाजपात जाहीर प्रवेश

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक गटाच्या येरवळे येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कराड दक्षिणमध्ये विविध गावातील अनेक गट काँग्रेसला राम राम करत भाजपात प्रवेश करत असल्याने, आमदार पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ माजली आहे. सर्वसामान्यांना … Read more

ट्रॅक्टर पलटून १ जागीच ठार

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  दगडाची डबर ओढत असताना  ट्रॅक्टर पलटी होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील येणपे येथे घडली आहे. बाळासो राजाराम शेवाळे वय ( ४३) असे मृताचे नाव आहे. येणपे ता. कराड नजीक माटेकरवाडी येथे  बाळासो शेवाळे हे दगडाची डबर  ओढण्यासाठी गेले असता अचानक ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने  शेताच्या बांधावरून ट्रॅक्टरने  … Read more