कराडची सोळवंडे गँग तडीपार; तेजस्वीनी सातपुतेंची मोठी कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेली सोळवंडे गँगला तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतचा आदेश काढला असून पद्या सोळवंडेसह सहा जणांना एक वर्षासाठी तालुक्यातून हद्दपार केले आहे. कराड तालुक्यात हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण … Read more

पाचवड येथील भीषण अपघातात पाच जखमी; जखमींमध्ये ३ राजस्थानी, २ कराडकरांचा समावेश

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाचवड ता. कराड येथे महामार्गावर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीला पाठीमागून आलेल्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाडीतील एकूण 5 जण जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला असून अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. जखमींमध्ये राजस्थानमधील 3 तर रेठरे खुर्द ता. कराड येथील 2 जण जखमी … Read more

कराड शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; सातारा जिल्ह्यात नवे 48 कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (ILI) 1 असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी … Read more

सातारा जिल्ह्यात १९ नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्यातील तारुख बनतेय हाॅटस्पाॅट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात 19 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये एकट्या कराड तालुक्यात 10 कोरोना बाधित सापडले आहेत. तारुख हे गाव आता नवे कोरोना हाॅटस्पाॅट बनत असून दिवसभरात तारूख येथे … Read more

मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी … Read more

यशवंत बँकेने केली एकाच दिवशी १००० वृक्षांची लागवड…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंत बँकेने ग्रीन फ्युचर ठेव योजनेत ठेव ठेवलेल्या ग्राहकाच्या अथवा त्याने सुचविलेल्या व्यक्तीच्या नावे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला होता. २१ जून २०२० रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधत बँकेच्या सेवकांच्या ३ टीम करून येरावळे, शेडगेवाडी (विहे) व उरुल या गावी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वड, पिंपळ, … Read more

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक; आत्तापर्यंत 206 जणांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 8 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या … Read more

कंपनीतील नोकरी सोडून स्पर्धापरीक्षेची तयारी केली आणि आज उपजिल्हाधिकारी झाला

कराड प्रतिनिधी । एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कराड येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम आला आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून रविंद्र शेळके, तर महिला प्रवर्गातून पर्वणी पाटील प्रथम आल्या आहेत. प्रसाद चौघुले याचे मूळ गाव कराड असून त्याने इंजिनीरिंगची पदवी कराड येथील गव्हर्नमेंट इंजिनीयरिंग कॉलेज येथून घेतली आहे. तसेच प्रसाद याचे शालेय शिक्षण … Read more

उंडाळे ग्रामीण रूग्णालयातील डाॅक्टर बेपत्ता? सर्पदंश झालेल्या रुग्णाला अॅम्ब्युलन्सही नाकारली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी एकीकडे कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणेच कौतुक होत असताना उंडाळे ग्रामीण रूग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव लोकांना येत आहे. सर्पदंश झालेल्या मुलावर उपचार करण्यासाठी लस ही नाही आणि रूग्णालयात डाॅक्टरही नाही, अशी अवस्था उंडाळे ग्रामीण रूग्णालयात असल्याचे समोर आले. त्यामुळे हे ग्रामीण रूग्णालय आहे? आरोग्य उपकेंद्र आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more